बिटा गुणोत्तर :
बिटा हे गुणोत्तर निर्देशांकाच्या मानदंडाशी (बेंचमार्क) म्युच्युअल फंडच्या योजनेच्या अस्थिरतेची तुलना दर्शवणारे परिमाण आहे. निर्देशांकाच्या तुलनेत या योजनेची कामगिरी सकारात्मक किंवा नकारात्मक किती आहे ते बिटावरून लक्षात येते. म्युच्युअल फंडच्या स्टँडर्ड डेविएशनला निर्देशांकाच्या मानदंडाच्या स्टँडर्ड डेविएशनने भागून येणाऱ्या संख्येस आर-स्क्वेअरने गुणिले असता बिटा मिळतो. ज्यावेळी बिटा एक येतो त्यावेळी निर्देशांकातील शेअर्सच्या कामगिरीनुसार फंडाची कामगिरी समतूल्य ठरते. ज्यावेळी बिटा एकपेक्षा अधिक असतो त्यावेळी शेअर बाजारापेक्षा फंडाची कामगिरी अधिक उजवी ठरली आहे. तर ज्यावेळी बिटा एकपेक्षा कमी असतो त्यावेळी फंडाची कामगिरी निर्देशांक मानदंडापेक्षा कमी झाली आहे. जर फंडाचा बिटा एक आहे, तर याचा अर्थ शेअर निर्देशांकातील प्रत्येक १० टक्के चढ किंवा उताराबरोबर त्या फंडाच्या निव्वळ मालमत्ता मूल्यात (नेट अॅसेट व्हॅल्यू) १० टक्के चढउतार अपेक्षित आहे.
स्टॅण्डर्ड डेविएशन :
फंडाच्या सरासरी उत्पन्नाच्या तुलनेत फंडाच्या उत्पन्नातील अस्थिरता मोजणारे परिमाण म्हणजे स्टँडर्ड डेविएशन होय. फंडाच्या भूतकालीन सरासरी उत्पन्नापेक्षा किती दूर या फंडाच्या उत्पन्न दर असू शकेल ते स्टँडर्ड डेविएशन दर्शवते. वेरिअन्सचे वर्गमूळ काढले असता स्टँडर्ड डेविएशन मिळते. वेरिअन्स पुढील सुत्राने काढले जाते.
स्टँडर्ड डेविएशनची संख्या जेवढी अधिक तेवढी म्युच्युअल फंडाच्या उत्पन्नात अस्थिरता अधिक असते. बहुसंख्य गुंतवणूकदारांची अस्थिरता कमी असलेल्या फंड्सना अधिक पसंती असते.