‘एडलवाईज एएमसी या वेगाने वाढणार्‍या एएमसीने एडलवाईज large and mid cap या ओपन – एंडेड इक्विटी योजनेची घोषणा केली. हा फंड म्हणजे निफ्टी लार्जमिडकॅप २५० इंडेक्सची प्रतिकृती आहे. या इंडेक्स फंडमध्ये लार्ज आणि मिडकॅप शेअरचे वाटप करता येणार असल्याने वृद्धी (मिडकॅप) आणि स्थिरता (लार्जकॅप) यांचा समतोल साधण्याची खात्री आहे.

या योजनेचा गुंतवणूक उद्देश आहे की, निफ्टी लार्ज मिडकॅप २५० इंडेक्समध्ये किरकोळ होणार्‍या चुका लक्षात घेऊन जास्तीत जास्त एकूण परतावा देणे आहे. या इंडेक्सला लार्ज ऍण्ड मिडकॅप आणि फ्लेक्सिकॅपच्या तुलनेत उत्तम कामगिरीचा रेकॉर्ड आहे. लार्जकॅप्स आणि मिडकॅप्सला समान भार दिल्याने कुठल्याही मार्केट कॅप विभागात होणारे नुकसान कमी होते आणि मिडकॅप स्टॉकमध्ये आश्वासक अर्थपूर्ण लाभ होतो. हा पहिला index fundआहे, जो निफ्टी लार्जमिडकॅप २५० इंडेक्सवर लॉंच होत आहे.

दि एडलवाईज लार्ज ऍण्ड मिडकॅप इंडेक्स फंड एनएफओ सबस्क्रिप्शनसाठी २६ नोव्हेंबर २०२१ पर्यंत खुला राहणार आहे. लया योजनेत कमीत कमी पाच हजार रु.ची गुंतवणूक करण्याची परवानगी देते आणि त्यानंतर एक रुपयाच्या पटीत करता येणार आहे. गुंतवणूकदारांना उत्तम परताव्यासाठी ५ ते ७ वर्षे गुंतवणूक करावी लागणार आहे. त्यात नियमित आणि थेट योजना आहे. त्याचे व्यवस्थापन भावेश जैन करणार आहेत.

अभिप्राय द्या!