दक्षिण आफ्रिकेत करोनाचा नवा विषाणू आढळून आल्यानंतर जगभरात एकच खळबळ उडाली आहे. या विषाणूने आज भारतासह आशियातील भांडवली बाजारांना जोरदार तडाखे दिले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स तब्बल १४०० अंकांनी कोसळला तर निफ्टीमध्ये ४०० अंकांची पडझड झाली. या प्रचंड आपटीने बाजारात साडे सहा लाख कोटींचा चुराडा झाला.

करोना प्रतिबंधात्मक लसीकरण वेगात सुरु असलं तर दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या नव्या करोना व्हेरिएंटने जगभरातील संशोधकांच्या मनात धडकी भरवली आहे. करोना पूर्णपणे बरा होणारे अद्याप खात्रीशीर औषध विकसित झालेले नाही. त्यातच दक्षिण आफ्रिकेतील नव्या व्हेरिएंटने वैद्यकीय क्षेत्राला नव्या संकटाची जाणीव करून दिली आहे. या घडामोडी गुंतवणूकदारांच्या मनात भीती निर्माण करण्यात कारणीभूत ठरल्या असल्याचे शेअर बाजार विश्लेषकांचे म्हणणे आहे.

अभिप्राय द्या!