एडलवाईस एसेट मॅनेजमेंटने ‘भारत बाँड ईटीएफ’चा तिसरा टप्पा जाहीर केला आहे. bharat bond ETF कार्यक्रम हा केंद्र सरकारचा गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचा एक उपक्रम आहे आणि त्यांनी उत्पादन डिझाइन, सादरीकरण आणि व्यवस्थापन करण्याची जबाबदारी एडलवाईस म्युच्युअल फंडाला दिलेला आहे.

ही नवीन भारत बाँड ईटीएफ आणि भारत बाँड फंड ऑफ फंड (एफओएफ) मालिका १५ एप्रिल २०३२ रोजी परिपक्व होईल. एनएफओ ३ डिसेंबर २०२१ पासून सुरू होईल आणि ९ डिसेंबर २०२१ रोजी बंद होणार आहे. ही नवीन मालिका तिसर्‍या टप्प्यात सादर करून, एडलवाईस म्युच्युअल फंड, ओपन ग्रीन शू पर्यायासह १००० कोटींची प्रारंभिक रक्कम उभारण्याचा प्रस्ताव केला आहे.

हा ईटीएफ, निफ्टी भारत बाँड निर्देशांकाच्या घटकांमध्ये गुंतवणूक करेल, ज्यामध्ये AAA रेट केलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचा समावेश आहे. डीमॅट खाती नसलेल्या गुंतवणूकदारांसाठी समान परिपक्वता असलेला भारत बाँड फंड ऑफ फंड (एफओएफ) देखील सुरू केला जाईल. भारत बाँड ईटीएफ एयूएम ऑक्टोबर २०२१ च्या शेवटी ३६,३५९ कोटी रुपये होता.

अभिप्राय द्या!