टाटा कॅपिटलने गेल्या महिन्यात  अद्वितीय आणि स्पेशल अशी  ‘सलाम लोन्स’ ही योजना सुरु केली आहे . कंपनीच्या ‘डू राइट’ या ब्रँड उपक्रमांतर्गत ‘सलाम लोन्स’चे अनावरण झाले असून, ज्यांना कर्ज उपलब्ध करून दिले जात नाही, अशा पात्र व्यक्तींना आता सहजपणे कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे.

‘सलाम लोन्स’ हा पहिलावहिला असा उपक्रम आहे की कर्जाची मंजूरी घेण्याची ताकद आता प्रत्यक्ष लोकांच्याच हातात असणार आहे. उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना आता टाटा कॅपिटलतर्फे सलाम केला जाणार आहे.

‘सलाम लोन्स’ या बोधवाक्यानुसार, या उपक्रमांतर्गत, ज्या लोकांनी खडतर परिस्थितीवर मात करून अनेकांसाठी आदर्श निर्माण केला आहे, तसेच आपले स्वप्न सत्यात उतरवण्याची ज्यांच्यात धमक आहे आणि त्याच निर्धाराने ते आपले स्वप्न प्रत्यक्षात साकारण्याची इच्छा राखतात, अशा लोकांना सलाम केला जाणार आहे.

असमाधानकारक पत इतिहास, अपुरे किंवा अनियमित उत्पन्न तसेच अचूक कागदपत्रांअभावी अनेकांना कर्ज मिळवता येत नाही.

‘सलाम लोन्स’ या उपक्रमांतर्गत, लोकांनी आपली स्वत:ची कथा आणि व्यथा तसेच आपण ओळखत असलेल्या व्यक्तींची कथा www.doright.in या संकेतस्थळावर अपलोड करायची आहे. या कथांमधून अनेकांची कथा सोशल अथवा डिजिटल माध्यमातून देशभरात प्रदर्शित केली जाईल. या कथेचा गाभा, ताकद अथवा क्षमता ओळखून देशातील लोकांना कर्जासाठी पात्र असलेल्या व्यक्तींना पाठिंबा द्यायचा आहे. त्यांच्या कर्तृत्वाला सलाम ठोकून लोकांना या उपक्रमात आपली भूमिका निभावायची आहे. एकदा लोकांनी ‘सलाम’ करून या व्यक्तीला पाठिंबा दिला की टाटा कॅपिटल त्या व्यक्तीसाठी कर्जाची पूर्तता करेल.

‘डू राइट’ या उपक्रमानुसार आता सलाम लोन्स या उत्पादनानुसार,ज्यांना कर्ज उपलब्ध होत नाही, अशा व्यक्तींना सलाम लोन्समार्फत सहजपणे कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. ज्या व्यक्तींची कथा अत्यंत्य योग्य आहे आणि त्यांनी दाखवलेले धैर्य कौतुकास्पद आहे. अशा व्यक्तींना आता टाटा कॅपिटलच्या सलाम लोन्स या उपक्रमांतर्गत कर्ज उपलब्ध करून देण्याची ताकद देशातील लोकांच्या हातात असणार आहे. या अद्वितीय उत्पादनाद्वारे ते आपले स्वप्न पूर्ण करू शकतात.”

‘सलाम लोन्स हे वैयक्तिक कर्ज असून सवलतीच्या दरात एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज वितरित केले जाणार आहे.

अभिप्राय द्या!