हैदराबाद येथे मुख्यालय असलेली बालाजी अमाइन्स ही भारतातील अ‍ॅलिफेटिक अमाईन आणि विशेष रसायने तयार करणारी आघाडीची कंपनी आहे. कंपनी देशात मेथिलामाइन्स, इथिलामाइन आणि ऑफ स्पेशॅलिटी केमिकल्सचे डेरिव्हेटिव्ह्ज आणि फार्मा एक्सिपियंट्सचे उत्पादन, विक्री तसेच निर्यात करते. ही उत्पादने आषधनिर्माण, कृषी रसायन, शुद्धीकरण, रंग, जलरंग, कोटिंग, पॉलिमर, वस्त्र तसेच व्यक्तिगत व घरगुती निगा, प्राण्यांचे पोषण इत्यादी सेवा क्षेत्रात पुरविली जातात.

या रसायन क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीने गेल्या वर्षात भागधारकांना २५४.८७% रिटर्न देत क्षेत्रातील मल्टीबॅगर बनण्याचा मान मिळविला आहे. कंपनीचा शेअर २२ डिसेंबर २०२१ रोजी रु. ३,१३०.५० वर स्थिरावला. वर्षभरापूर्वी, २२ डिसेंबर २०२० रोजी तो रु. ८८२.१५ या नीचांकी स्तरावर होता. परिणामी या कंपनीचे शेअर राखणा-या गुंतवणूकदारांची संपत्ती दरम्यान तिप्पट झाली.

अभिप्राय द्या!