नवीन वर्षातही शेअर मार्केट आयपीओमुळे वारंवार चर्चेत राहणार आहे. २०२१ मध्ये तेजीनंतर २०२२ मध्येही IPO मधून कंपन्यांनी १.५ लाख कोटी रुपये उभारण्याची अपेक्षा ठेवली आहे. Adani group and Baba ramdev आयपीओ या महिन्यात येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे भारतीय बाजारपेठेत गेल्या दोन दशकांतील आयपीओसाठी २०२१ हे सर्वोत्तम वर्ष राहिले. अत्याधिक तरलता आणि किरकोळ गुंतवणूकदारांचा वाढता सहभाग यामुळे आयपीओच्या उत्साहाला चालना मिळत राहिली आणि या महामारीच्या काळातही कंपन्यांनी १.२ लाख कोटी रुपये उभे केले.
याशिवाय, ईएसएएफ स्मॉल फायनान्स बँक लि.चा ९९८ कोटी आणि ट्रॅक्सन टेक्नॉलॉजीचा (Traxon Technologies) ५०० कोटी रुपयांचा आयपीओ देखील या महिन्यात येण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, स्कॅनरे टेक्नॉलॉजी (Skanray Technologies) चा ४०० कोटी रुपयांचा आयपीओ तसेच ओएफएस असेल. तसेच ईएसडीएस सॉफ्टवेअर लि.चा ३३२ कोटींचा आयपीओ देखील ओएफएस सोबत येणार आहे.