सॅमको म्युच्युअल फंड ने आज आपला पहिला एनएफओ “सॅमको फ्लेक्सी कॅप फंड” लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. हा एनएफओ १६ जानेवारी २०२२ रोजी खुला होईल आणि ३१ जानेवारी २०२२ रोजी बंद होईल. हा फंड त्यांच्या मालमत्तेपैकी ३५ टक्के निधी जागतिक समभागांमध्ये गुंतवेल. यातील २५ स्टॉक पोर्टफोलिओ कस्ट्रक्शन स्ट्रॅटेजी हे सुनिश्चित करते की गुंतवणूकदारांना वैविध्यपूर्णतेचे फायदे मिळतील.

ही योजना केवळ अशा कार्यक्षम कंपन्यांमध्येच गुंतवणूक करेल ज्यांच्याकडे वाढीच्या खर्चासाठी रोख व स्थिर भांडवलाद्वारे उच्च परतावा निर्माण करण्याची क्षमता आहे. भांडवलावर २५% समायोजित परतावा असलेल्या सॅमको ने व्यवसायांमध्ये गुंतवणूक करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या योजनेत निव्वळ मालमत्तेच्या ६५% – ३५% च्या प्रमाणात भारत आणि जागतिक स्तरावर २५ स्टॅक्स (समभाग) मध्ये या योजद्वारे गुंतवणूक केली जाईल. हे समभाग कंपनीच्या हेक्साशिल्ड फ्रेमवर्कमध्ये बसणार्या १२५ कंपन्यांमधील असतील.

अभिप्राय द्या!