गृह कर्जातून लवकर मुक्त होण्यासाठी खाली काही उपाय लिहित आहे, जमतील तेवढे करा व बघा लवकरच कर्जमुक्त व्हाल :

गृहकर्ज रक्कम एवढे तुमचे जीवन बीमाकृत नसल्यास सर्वप्रथम ते करून घ्या. तुमच्या पश्चात घरच्यांच्या डोक्यावर छप्पर तसेच राहील.

दर महिन्याचा हप्ता कधीच बुडवू नका. चेक/ इसीएस बाऊंस झाला तर क्रेडिट स्कोअर खराब होतो.

दर वर्षी पगारवाढ झाली की त्या अनुषंगाने तुमचा मासिक हप्ता ही वाढवून घ्या. अशी सोय असते. अगदी ५००-१००० रुपये ही वाढवतां आले तरी चांगले कारण वाढवलेली रक्कम मूळ मुद्दल मधून वजा होते.

दर वर्षी पगाराव्यतिरिक्त बोनस/ एक्स ग्रेशिया/ इंसेंटिव्ह मिळाला की ती “प्रीपेमेंट” म्हणून मुद्दल खाती जमा करा.

दर वर्षी एकदा गृहकर्ज घेतलेल्या बैंकेत/ संस्थेत भेटून या. व्याजदर कमी करण्यासाठी एखादी योजना असल्यास त्याचा लाभ घेऊन व्याज दर कमी करून घ्या.

कुठल्याही परिस्थितीत मासिक हप्त्याची रक्कम कमी न करतां मुदत कमी करून घ्यावी म्हणजे व्याजाचे प्रमाण कमी कमी होत जाते.

कर्जमुक्त लवकर व्हाल पण गृहकर्जावर मिळणाऱ्या आयकर सवलतींकडे लक्ष ठेवून योग्य तो निर्णय घ्या.

तुमच्या मनांत असलेले सगळे प्रश्न / शंका त्यांच्या कार्यालयात जाऊन प्रत्यक्ष किंवा इमेल वर समजून घ्या. गैरसमज महागात पडतो.

अभिप्राय द्या!