आपण एखाद्या आर्थिक संस्थेशी व्यवहार करताना कधी कधी आपले नेट वर्थ स्टेटमेंट मागवले जाते. अशा वेळी नेट वर्थ स्टेटमेंट म्हणजे काय आणि ते कसे मिळवावे असे प्रश्न निर्माण होतात. नेट वर्थ म्हणजे काय ते समजून घेऊया? सोप्या भाषेत सांगायचे तर नेट वर्थ तुमची आर्थिक पत.

नेट वर्थ कसे काढावे ?

नेट वर्थ = आपल्या मालकीच्या मालमत्ता (Assets)- आपल्याकडे असलेली उत्तरदायित्व (loans)

नेट वर्थ स्टेटमेंट म्हणजे आपल्या आर्थिक आरोग्याचा अहवाल. जसे ब्लड टेस्ट आपल्याला आपल्या आरोग्यबद्धल माहिती देते, सध्या आपले आरोग्य कसे आहे ते दर्शवितो अगदी तसेच नेट वर्थ स्टेटमेंट आपल्याला आपल्या आर्थिक स्थिती बाबत आपली सद्य परिस्थिती दर्शवितो.

जर नेट वर्थ सकारात्मक आणि उच्च असेल तर आपली आर्थिक स्थिती उत्तम आहे असे समजावे आणि जर ते नकारात्मक असेल किंवा कमी असेल तर याचा अर्थ असा आहे की आपण कठीण आर्थिक स्थितीत आहात आणि या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी कठोर परिश्रम करणे आवश्यक आहे.

नेट वर्थची गणना करताना आम्ही आपण आपल्या सर्व भिन्न मालमत्तेचा विचार करायला हवा जसे की

  • आपल्याकडील तरल मालमत्ता
    • इक्विटी: डायरेक्ट इक्विटी, इक्विटी एमएफ होल्डिंग्ज,
    • डेट : बॉन्ड्स, पीपीएफ, ईपीएफ, एफडीज आरडी, एनपीएस, डेट एमएफ फंड्स, शासकीय बाँड
    • रोख आणि रोख समतुल्य: हातातील रोख रक्कम, खात्यातील शिल्लक बचत
  • आपल्याकडील स्थावर मालमत्ता:
    • जमीन,
    • भूखंड,
    • निवासी फ्लॅट्स,
    • व्यावसायिक मालमत्ता,
    • शेती जमीन इ
  • सोने:
    • भौतिक सोन्याची किंमत,
    • ईटीएफ,
    • गोल्ड बाँड

आपल्या सर्व भिन्न उत्तरदायित्वांमध्ये

  • वैयक्तिक कर्ज
  • शिक्षण कर्ज
  • गृह कर्ज
  • क्रेडिट कार्ड कर्ज
  • व्यावसायिक मालमत्ता कर्ज

म्हणूनच नेट वर्थ म्हणजे एक व्यक्ती किंवा कुटुंबाच्या मालकीच्या सर्व मालमत्तेमधून त्यांना देय असलेल्या सर्व कर्जांची वजाबाकी

लक्षात ठेवा

आपल्या मालकीची कार आपली मालमत्ता मानली जाऊ शकत नाहीत कारण ती एक अवमूल्यित मालमत्ता आहे. आपली निवासी मालमत्ता देखील निव्वळ किंमतीत मानली जात नाही कारण ती प्रामुख्याने निवासी उद्देशाने घेतलेली असते आणि त्यातून कोणतेही उत्पन्न आपल्याला मिळत नसते.

अभिप्राय द्या!