गणतंत्र दिन
आमचे सर्व ग्राहक हितचिंतक आणि वाचक बंधू भगिनींना गणतंत्र दिनाच्या शुभेच्छा !
या वर्षी आपण आपल्या स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापन दिन साजरा करीत आहोत आणि त्या अनुषंगाने अनेक विचार मनात येत आहेत.
गेल्याच आठवड्यात भारतीय गुतंवणूकदारांच्या बचतीसंबंधीचा एक अहवाल वाचनात आला.  त्यातील आकडेवारी अत्यंत सोप्या शब्दात मी आज आपल्यासमोर मांडू इच्छीतो. सर्वसामान्यत: एकूण गुंतवणुकीपैकी भारतातील प्रत्येकजण १८% रक्कम बँकेत गुंतवतो.१६% पेक्षा जास्त रक्कम विमा योजना अर्थात Endowment Plan संबधी योजनेत असते आणि २५% गुंतवणूक ही दागिन्यांच्या रुपात असते आणि उर्वरित सर्व गुंतवणूक ही घर किंवा तत्ससंबधी गोष्टीमध्ये अडकलेली असते .

अपवादात्मक स्थितीत काहीजण Equity मध्ये पैसे गुंतविताना दिसतात.
या गुंतवणुकीचे एका वेगळ्या दृष्टीकोनातून विश्लेषण केल्यास घर आणि सोने यातील गुंतवणूक ही *आर्थिक स्वातंत्र्य उपभोगण्यास निरुपयोगी असते. * कारण कीतीही अडचण आली तरी भारतीय मनुष्य हा आपले घर किंवा दागिने हे विकत नाही.
बँकेतील मुदत ठेवी ह्यावरील आजचे व्याजदर पहाता त्यातून मिळणारे उत्पन्न हे आजच्या महागाईवाढीच्या दरापेक्षा सुद्धा कमी असते.  टॅक्स वाचविण्यासाठी केलेली LIC तील गुंतवणूक ही आपल्याला अंतिमतः ६ % ते ८ % परतावा देते.  यात risk cover हा भाग मी वेगळ्या रीतीने पहावा असे समजत आहे.
या सर्वाचा अर्थ, थोडक्यात भारतीय मनोवृत्ती ही आपल्या गुंतवणुकीतून मोठी उद्दीष्टे गाठणे, मोठी स्वप्ने सत्यात उतरविणे किंवा आर्थिक स्वातंत्र्य अनुभवण्यास आणि त्याद्वारे आनंद उपभोगण्यास कमी पडल्याचे जाणवते.
आजच्या पिढीतील युवावर्ग सुद्धा अजूनही “ पिढ्यांपिढ्याचा साथी ” या स्वरुपात मिळवता झाल्याक्षणी Endowment Policy घेताना दिसतो.
चांगल्या कंपनीचे चांगले समभाग खरेदी करून त्यातून होणारा फायदा आणि मिळणारे आर्थिक स्वांतत्र्य उपभोगण्याची माहिती घेतानाही फार कमी युवक दिसतात. * Infosys, Wipro, TCS या कंपन्यातील समभागात १० वर्षापूर्वी केलेल्या गुंतवणुकीद्वारे अक्षरशः *काही जणांनी कोट्याधीश होण्याचे स्वप्न साकार केले आहे.
UTI या पहिल्या मुच्युअल फंडाने सादर केलेल्या मास्टर शेअर युनिट स्कीममध्ये ज्यांनी 1986 साली रु.१० लक्ष गुंतविले असतील ते तर २०२१ साली १४ कोटी रुपयांचे मालक झाल्याचे मी पाहिले आहे.
गेली दोन वर्षे कमी जास्त प्रमाणात सर्वत्र सुरु झालेल्या Lockdown आणि वर्क फ्रॉम होमच्या कालखंडात अनेक तरूण नवगुंतवणूकदारांनी demat खाती उघडल्याची दिसत आहे. पण त्यांचा कल हा योग्य माहितीद्वारे investment करून आर्थिक स्वांतत्र्य मिळवण्यात यशस्वी होताना दिसून येत आहे असे जाणवत नाही.
म्हणून या भारतीय स्वांतत्र्याच्या ७५ व्या वर्षात आपण साजरा करीत असलेल्या गणतंत्र दिनाच्या मुहूर्तावर आर्थिक स्वांतत्र्य उपभोगण्याच्या दृष्टीने किमान एक तरी NPS खाते सुरु करून त्याद्वारे Equity मधून होणारा फायदा मिळवण्यासाठी सज्ज होण्याचा संकल्प करूया.!
धन्यवाद.
यासंबधी अधिक माहिती हवी असल्यास आमच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.
प्रदीप जोशी :- 9422429103

अभिप्राय द्या!