1 जानेवारी 2021 पासून रिझर्व्ह बँकेने एक नवीन प्रणाली आणली आहे, तिचे नाव आहे ‘पॉझिटिव्ह पे सिस्टम!’ तीच ही पॉझिटिव्ह पे कन्फर्मेशन प्रणाली !
बँकिंग उद्योगातील फसवणुकीला आळा घालण्यासाठी रिझव्र्ह बँकेकडून जे काही उपाय योजले जातात त्यात पळवाटा शोधण्यासाठी फसवणूक करणारे नेहमीच तयार असतात.
धनादेशावरील तपशील बदलून फसवणूकीने उच्च मूल्याच्या धनादेशांवर प्राप्तकर्त्याचे नाव बदलणे ही एक सामान्य फसवणूक आहे. याला तोंड देण्यासाठी आरबीआयने आता नवीन उपाय शोधला आहे.
1 जानेवारी 2021 पासून, चेकसाठी ‘पॉझिटिव्ह पेमेंट सिस्टम’ लागू झाली आहे, ज्या अंतर्गत 50,000 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या चेक व्यवहारांसाठी खातेदाराकडून मुख्य तपशीलांची पुष्टी करणे आवश्यक आहे.
या सुविधेचा लाभ घेणे अथवा न घेणे हे सर्वस्वी खातेदारावर अवलंबून असेल. तथापि, रुपये 5 लाख आणि त्याहून अधिक रकमेच्या धनादेशाच्या बाबतीत ते अनिवार्य करण्याचा अधिकार वैयक्तिक बँकांना दिला आहे.
या पेमेंट प्रणाली अंतर्गत, धनादेश जारी करणार्याने लाभार्थीचे नाव, पैसे देणार्याचे नाव आणि रक्कम यासारख्या चेकच्या काही किमान तपशीलांसह एसएमएस, मोबाइल अँप, इंटरनेट बँकिंग किंवा एटीएमद्वारे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सादर करणे आवश्यक आहे.
चेक पेमेंटसाठी सादर करण्यापूर्वी हे तपशील क्रॉस-चेक केले जातील. यात काही विसंगती आढळल्यास तत्काळ उपाययोजना केल्या जातील.
अधिक सुरक्षित पेमेंट सिस्टीमचा विस्तार करण्यासाठी आणि त्यायोगे ग्राहकांच्या मनात विश्वास निर्माण करण्याचा हा रिझर्व्ह बँकेचा आणखी एक उपक्रम आहे!
नमोस्तुते !