नवीन वर्षासाठी चांगले आर्थिक संकल्प करतांना मूलभूत आर्थिक बाबी समजणे हिताचे आहेत. याच बाबी पुढे तुमचे आर्थिक संकल्प बनतात !!

  • आपल्या पहिल्या पगारापासून गुंतवणूक सुरू करा.
  • आपल्या जीवनाची आर्थिक उद्दीष्टे ओळखा. त्यांना अल्प मुदतीच्या, मध्यम-मुदतीच्या आणि दीर्घ मुदतीच्या श्रेणीमध्ये विभाजित करा. ध्येय-आधारित गुंतवणूक सिद्धांतानुसार(Goal Based Investment Theory) गुंतवणूक करा.
  • ध्येयाविरहित गुंतवणूक करू नका. केलेली प्रत्येक गुंतवणूक आपल्या आर्थिक ध्येयाशी संबंधित करा.
  • मूलभूत गरजा आणि इच्छिक गरजा (needs and wants) या खर्चाच्या पॅटर्न नुसार आपल्या खर्चाचे विश्लेषण करण्यास प्रारंभ करा. आपण WANTS वर जास्त खर्च करीत आहात की नाही ते तपासा.
  • मासिक जमाखर्च आणि ताळेबंद मांडा तसेच मासिक बचत दर निश्चित करा आणि त्याचे काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करा. उत्पन्न-खर्च = बचत करण्याऐवजी मिळकत-बचत = खर्च फॉर्म्युलाचे अनुसरण करा.
  • विमा आणि गुंतवणूकीची कधीही सरमिसळ करू नका. जीवन विम्याच्या गरजेसाठी विमा कंपन्यांच्या पारंपारिक विमा पॉलिसी खरेदी करणे थांबवा.
  • गुंतवणूकीचे पर्याय म्हणून फक्त आवर्ती ठेवी (RD) आणि मुदत ठेवींना (FD ) चिटकून राहू नका.
  • शेअर्स बाजाराला सट्टा बाजार समजू नका. आवश्यक ते ज्ञान संपादन करून शेअर्स बाजाराला गुंतवणुकीचा एक पर्याय म्हणून विचारात घ्या.
  • गुंतवणूक म्हणून फक्त रिअल इस्टेट आणि सोने खरेदी थांबवा. ही मालमत्ता तरल नाही.
  • आपण नसल्यास आपल्या प्रियजनांच्या जीवनशैलीचे रक्षण करण्यासाठी टर्म विमा योजना खरेदी करा.
  • मुलांच्या शैक्षणिक उद्देशाने त्यांच्या नावावर विमा पॉलिसी खरेदी करू नका.
  • चांगल्या परताव्यासाठी आणि तरलतेसाठी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करा.
  • नियोक्ताद्वारे प्रदान केलेल्या आरोग्य योजनेशिवाय (employer health insurance) स्वत: साठी आणि पालकांसह कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी पुरेसे आरोग्य कवच खरेदी करा.
  • आरोग्याचा विमा प्रीमियम पैशाचा अपव्यय मानू नका. जेव्हा तुम्ही निरोगी, तंदुरुस्त आणि ठीक असाल तेव्हा आरोग्य योजना घ्या.
  • करिअरच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यावर घर विकत घेण्यापासून आणि स्वत: ला प्रचंड ईएमआयमध्ये वचनबद्ध करण्यास टाळा.
  • तरुण असतांना प्रथम द्रव आर्थिक मालमत्तेचा (liquid financial asset) थोडा आधार बनवा आणि त्यानंतर भौतिक मालमत्तेचा (physical asset) विचार करण्यास सुरवात करा.
  • उत्पन्नाच्या अनेक स्त्रोतांचा विचार करा. केवळ उत्पन्नाच्या एका प्रवाहावर अवलंबून राहू नका. आपण पासिव्ह उत्पन्न कसे मिळवू शकता याबद्दल विचार करा. आपल्यासाठी पैसे कमावण्यासाठी पैश्याला कामाला लावा.
  • मित्र, सहकारी किंवा नातेवाईकांनी सूचित केलेल्या कोणत्याही कंपन्यांच्या समभागात विचार न करता गुंतवणूक करू
  • मार्केटमधून अवास्तव परतावा मिळण्याची अपेक्षा करू नका . जेव्हा अपेक्षेनुसार परतावा मिळत नसेलतर गुंतवणूक तोट्यात असतानाही कोणताही अभ्यास वा विश्लेषण न करता ताबडतोब त्या गुंतवणुकीतून बाहेर पडू नका.
  • अल्प मुदतीत चढ उतारांना घाबरून दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीला थांबवू नका.
  • गुंतवणूकीतून जास्तीत जास्त परतावा मिळवण्याच्या अट्टाहासापेक्षा पडत्या बाजारात जास्त नुकसान होऊ नये म्हणून नकारात्मक जोखीम व्यवस्थापन (downside risk management) करण्यावर जोर देणे फार महत्वाचे आहे. .
  • जेव्हा शेयर बाजार कोसळतो तेव्हा म्युच्युअल फंडाच्या सुरु असलेल्या एसआयपी थांबवून आणि बाजार पुन्हा चढता झाल्यावर परत एसआयपी सुरू करणे दीर्घ मुदतीच्या संपत्ती निर्माणासाठी घातक आहे . अश्या मानसिकतेला कळपांची मानसिकता (herd mentality) म्हणतात
  • इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये मागील एक किंवा दोन वर्षांचीच कामगिरी पाहता गुंतवणूककरणे जोखिमेचे असते . खरे तर मागील ५ ते १० वर्षांच्या परताव्याचे विश्लेषण गरजे चे असते .
  • गुंतवणुकीसाठी निवडलेले इक्विटी म्युच्युअल फंड हे आपल्या जीवनाच्या आर्थिक ध्येय तसेच त्या ध्येयाच्या कालावधी नुसार योग्य आहे की नाही हे तपासून पाहणे अत्यंत महत्वाचे आहे
  • दीर्घ मुदतीच्या आर्थिक लक्ष्यांसाठी इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करताना दीर्घ मुदतीचा दृष्टीकोन ठेवणे आवश्यक आहे
  • सेवानिवृत्तीच्या नियोजनापेक्षा सुट्टी मध्ये सहली ला जाणे , इलेक्ट्रॉनिक्स आणि घरगुती वस्तू खरेदी करणे तसेच मुलांचे शिक्षण आणि लग्नाच्या नियोजनाला अधिक महत्त्व देणे योग्य नाही.
  • यासारख्या अल्पावधीतील आणि मध्यम अवधितील उद्दीष्टे आणि दुय्यम लक्ष्यांना सेवानिवृत्तीच्या नियोजनापेक्षा अधिक महत्त्व दिल्यास आर्थिक नियोजन फसू शकते.
  • अतिरिक्त परताव्याच्या लोभापायी कोणत्याही फसव्या (प्रॉक्सी) योजनेत गुंतवणूक करणे प्रकर्षाने टाळा.
  • गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक उत्पादनांची (financial products) संपूर्ण वैशिष्ट्ये, गुणविशेष आणि साधक आणि बाधक गोष्टींचे विश्लेषण करणे अत्यावश्यक आहे.
  • कोणत्याही मालमत्तेत गुंतवणूक करण्यापूर्वी स्वतःच्या जोखमीचे विश्लेषण (risk profiling) करून घ्या. विशिष्ट लक्ष्यासाठी मालमत्ता वाटपानुसार (asset allocation) केलेली गुंतवणूक नेहमीच फायदेशीर असते
  • गुंतवणूक सुरू करण्यापूर्वी आवश्यक असलेले स्वतःचे तसेच आर्थिक उत्पादनाचे जोखीम व्यवस्थापन करून घ्या.
  • आपत्कालीन निधी, स्वत: चा पुरेसा जीवन विमा आणि स्वत: व कुटुंबातील सदस्यांसाठी पुरेसा आरोग्य विमा या तीन गोष्टी गुंतवणुकीपूर्वी करून घ्या .
  • क्रेडिट कार्डचा अतिरिक्त वापर करू नका आणि दरमहा आलेल्या बिलाच्या रकमेमधून पूर्ण रक्कम फेडण्यावर भर द्या
  • गुंतवणूकीत स्वयं शिस्त तसेच सातत्य राखा .
  • शेअर बाजाराच्या अल्प मुदतीच्या चढ-उतारांबद्दल अति भीती बाळगू नका .
  • या अल्प मुदतीच्या चढउतारांच्या आधारावर घाईने निर्णय घेऊन गुंतवणूक करणे थांबवल्यास दीर्घकाळात मिळणाऱ्या कंपाऊंडिंग फॅक्टरच्या फायद्यापासून आपण वंचित राहू शकतात
  • अति लोभ आणि अति भीतीमुळे भारतीय सर्वसामान्य गुंतवणूकदार दीर्घकाळात कमाऊ शकणारा पैसा गमावतात आणि गुंतवणूकीद्वारे कधीही दीर्घकालीन संपत्ती निर्माण करु शकत नाहीत.
  • त्यामुळे अति लोभ आणि अति भीती या मानवीय भावनांना गुंतवणुकीच्या संदर्भात वरचढ होऊ देऊ नका.
  • यासंबधी अधिक माहिती हवी असल्यास आमच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.
    प्रदीप जोशी :- 9422429103

अभिप्राय द्या!