नावी मुच्यूअल फंडाने आज नावी US TOTAL Market funds of funds ही नवीन योजना बाजारात आणली आहे. अमेरिकेत सक्रीय पध्दतीने कार्यरत असलेल्या मोठ्या ईटीएफ फंडापैकी एक असलेल्या व्हॅनगार्ड टोटल स्टॉक मार्केट ईटीएफ फंडात या नवीन योजनेतीन निधी गुंतविला जाणार आहे. या फंडाचे सध्याचे खर्च गुणोत्तर प्रतिवर्षासाठी ०.०६ टक्के आहे. हा फंड खुला झाला असून येत्या १८ फेब्रुवारी २०२२ ला बंद होणार आहे. सेबीने विदेशी बाजारात गुंतवणूकीस तात्पुरत्या जाहीर केलेल्या बंदीचा या नवीन योजनेवर काहीही परिणाम होणार नाही, कारण सेबीची बंदी ही विदेशी मुच्यूअल फंडासाठी असून नावी यूएस टोटल स्टॉक मार्केट फंड ऑफ फंड हा प्रामुख्याने ईटीएफमध्ये गुंतवणूक करणार आहे.

व्हॅनगार्ड टोटल स्टॉक मार्केट ईटीएफ ( व्हीटीआय) हा सीआरएसपी यूस टोटल मार्केट निर्देशांकाचा मागोवा घेता. या निर्देशांकात चार हजारांपेक्षा अधिक समभाग असून ते जवळपास अमेरिकेच्या गुंतवणूक शेअरबाजाराचे १०० टक्के प्रतिनिधीत्व करतात. लार्ज, मिड, स्मॉल आणि मायक्रो अशा भांडवली प्रकारात हा फंड गुंतवणूक करत असला तरी अॅपल, मायक्रोसॉफ्ट, अल्फाबेट, अॅमेझॉन, फेसबुक आणि टेस्लासारख्या जगप्रसिध्द कंपन्यांमध्ये लक्षणीय अशी गुंतवणूक करतो.

अभिप्राय द्या!