करोनाच्या काळात अनेकांना नाजूक आर्थिक परिस्थितीतून जावे लागले. काहीजणांच्या व्यवसायावरही परिणाम झाला, तर काही लोकांना नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी पैशांची गरज भासली. अशा परिस्थितीत जर तुम्ही देखील loanघेण्याचा विचार करत असाल आणि तुम्हाला विमा पॉलिसी घ्यायची असेल किंवा आधीच विमा काढला असेल, तर तुम्ही त्यावर सहजपणे कर्ज घेऊ शकता. आरोग्य विमा पॉलिसीवर कर्ज घेणे, हा एक चांगला पर्याय आहे, कारण विमा पॉलिसीवरील कर्ज मिळणे खूप सोपे आहे आणि त्यावर व्याज देखील कमी आहे.
विमा पॉलिसीवरील व्याजाचा दर प्रीमियमची रक्कम आणि भरलेल्या प्रीमियमच्या संख्येवर अवलंबून असतो. जीवन विम्यावरील कर्जावरील व्याज १०-१२ टक्के दरम्यान असते. या आधारे तुम्हाला हवे असल्यास तुम्ही कर्जाची रक्कम घेऊ शकता आणि ती तुमच्या व्यवसायात लावून वापरू शकता.
जर तुम्हाला कर्जासाठी अर्ज करायचा असेल, तर तुम्हाला त्यासाठी विमा कंपनी किंवा संबंधित बँकेशी संपर्क साधावा लागेल. तसेच तुम्हाला तुमच्या विमा पॉलिसीची संपूर्ण माहिती द्यावी लागेल. व्याजदर आणि प्रीमियमनुसार कर्जाची निवड करावी लागेल. सर्व तपशील भरल्यानंतर कर्जाची रक्कम तुमच्या खात्यावर पाठवली जाईल.
विम्यावरील कर्ज घेण्यासाठी, तुम्हाला मूळ विमा पॉलिसी, पॉलिसीची कागदपत्रे आणि रद्द केलेला चेक आवश्यक आहे.
कर्ज फेडले नाही तर…
तुम्ही कर्जाची रक्कम परत न केल्यास कर्जाची रक्कम तुमच्या सरेंडर मूल्यातून वसूल केली जाते. तसेच तुमची विमा पॉलिसी लॅप्स केली जाते. तुम्हाला कर्जाच्या रकमेसह प्रीमियम देखील भरावा लागेल.