• बचत खात्यावर  ७ टक्के व्याजदर
  • AU स्मॉल फायनान्स बँक बचत खात्यांवर ७ टक्क्यांपर्यंत व्याजदर देत आहे. सरासरी मासिक शिल्लक आवश्यकता २ हजार ते ५ हजार आहे.
  • उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक बचत खात्यांवर ७ टक्के व्याजदर देत आहे.
  • इक्विटास स्मॉल फायनान्स बँक बचत खात्यांवर ७ टक्के व्याजदर देत आहे. त्यासाठी सरासरी मासिक शिल्लक आवश्यकता अडीच ते १० हजार रुपये आहे.
  • DCB बँक बचत खात्यांवर ६.५ टक्के पर्यंत व्याजदर देते. खासगी बँकांपैकी ही बँक सर्वोत्तम व्याजदर देते. यासाठी किमान शिल्लक रक्कम अडीच ते ५ हजार रुपये आहे.
  • सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक बचत खात्यांवर ६.२५ टक्के व्याजदर देत आहे. सरासरी मासिक शिल्लक आवश्यकता २ हजार आहे.

गुंतवणूक करणे किती सुरक्षित असेल…

जर तुम्ही या बँकांमध्ये पैसे जमा करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला तुमच्या क्षेत्रातील परिस्थिती, या बँकांचा चांगला ट्रॅक रेकॉर्ड, ग्राहकांची संख्या आणि त्यांचा दीर्घकाळ स्थिर कालावधी याविषयी माहिती असणे आवश्यक आहे किंवा तुम्ही त्याबद्दल तज्ञांना भेटू शकता. त्यांच्याकडून देखील मत घ्या.

अभिप्राय द्या!