महिंद्रा अॅसेट मॅनेजमेंट कंपनी प्रा. लिमिटेड (एमएएमसीपीएल), या महिंद्रा म्युच्युअल फंडाच्या गुंतवणूक व्यवस्थापन आणि महिंद्रा फायनान्सच्या संपूर्ण मालकीच्या उपकंपनीने आपल्या दोन नव्या ओपन एंडेड स्कीम जाहीर केल्या आहेत, याअंतर्गत महिंद्रा म्युच्युअल बाल विकास योजना ही ओपन एंडेड बॅलन्स स्कीम आणि महिंद्रा म्युच्युअल फंड बढत योजना ही ओपन एंडेड इक्विटी स्कीम जाहीर करण्यात आली आहे. हा नवा फंड 20 एप्रिल 2017 रोजी पासून सुरू असून 4 मे 2017 रोजी बंद होईल. यानंतर या योजना पुन्हा विक्रीतील सातत्य आणि पुनखरेदीसाठी 18 मे 2017 रोजी खुल्या केल्याआहेत .

`महिंद्रा म्युच्युअल फंड बाल विकास योजनां’ना भांडवली मान्यता निर्माण करणे आणि उत्पन्नांच्या माध्यमांची निर्मिती दीर्घकाळासाठी करणे, यासाठी इक्विटीतील गुंतवणूक आणि इक्विटीसंबंधित सामग्री तसेच कर्ज आणि पैशांच्या बाजारपेठांच्या सामग्रीची निर्मिती करणे गरजेचे आहे. या फंडातील गुंतवणूक केवळ अल्पवयीन बालकांच्या नावेच होऊ शकते आणि या खात्यातील गुंतवणूक सर्व कुटुंबीय आणि मित्र-परिवार यापैकी कुणीही करू शकते. या फंडातर्फे पर्यायी लॉक-इन गुंतवणुकीचा कालावधी असून, तो मूल 18 वर्षांचे होईपर्यंतचा आहे.

अभिप्राय द्या!