रशिया-युक्रेन संघर्ष टिपेला पोहोचल्याने भांडवली बाजारात मोठी पडझड झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला सोन्याला मात्र तेजीची झळाळी प्राप्त झाली आहे. आज मंगळवारी कमॉडिटी बाजारात सोन्याचा भाव तब्बल ५५० रुपयांनी वाढला. चांदीमध्ये १००० रुपयांची वाढ झाली. गेल्या नऊ महिन्यातील हा उच्चांकी स्तर आहे. आर्थिक अनिश्चितता वाढल्याने नजीकच्या काळात सोनं आणखी महागण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply