महिंद्र फायनान्सने ग्राहकांसाठी विशेष ठेव योजना सादर केली आहे. डिजिटली सक्रिय असणाऱ्या ग्राहकांसाठी ही योजना आहे. तसेच महिंद्रा फायनान्शिअल सर्व्हिसेसचे लक्ष ग्रामीण आणि निमशहरी क्षेत्रावर केंद्रित आहे. कंपनी संकेतस्थळाद्वारे ठेवीदारांना डिजिटल मोडमध्ये विशेष ठेव योजना ऑफर करेल. ही योजना सध्याच्या योजनांपेक्षा वेगळी आहे.
या योजनेअंतर्गत ग्राहकांना वार्षिक ०.२० टक्के अधिक व्याज मिळेल. याअंतर्गत ग्राहकांना ३० महिन्यांच्या ठेवीवर ६.२० टक्के, तर ४२ महिन्यांच्या ठेवीवर ६.५० टक्के व्याज मिळेल. कंपनीने डिजिटलायझेशन उपक्रमांतर्गत ही योजना सुरू केली आहे.
ठेवीदारांसाठी ही योजना संकेतस्थळाद्वारे उपलब्ध असेल. गुंतवणुकीसाठी ग्राहकांना https://www.mahindrafinance.com ला भेट द्यावी लागेल. ग्राहकांना अनेक प्रकारच्या डिजीटल आणि ऑटोमेशनशी संबंधित सुविधाही मिळतील, असा विश्वास कंपनीला आहे.