स्टेट बँक ऑफ इंडिया कार्डने आपल्या क्रेडिट कार्डधारकांसाठी एक इशारा दिला आहे. एसबीआय कार्डने क्रेडिट कार्ड ग्राहकांना त्यांचा कस्टमर केअर नंबर शोधण्यासाठी कधीही सर्च इंजिनची मदत घेऊ नये, असे आवाहन केलं आहे. ग्राहकांना फसवणुकीपासून वाचवणे हा या मागील उद्देश आहे. सर्च इंजिनच्या मदतीने कस्टमर केअर नंबर शोधल्याने ग्राहकांना बनावट क्रमांक मिळू शकतात. बनावट क्रमांकावर कॉल केल्याने ग्राहकांची फसवणूक होऊ शकते, तसेच त्यांचे आर्थिक नुकसानही होऊ शकते.

अभिप्राय द्या!