भारतातील पहिला म्युचुअल फंड स्थापन होऊन ५० वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे व आज रोजी म्युचुअल फंडामध्ये साधारणपणे ४२ फंड घराणी कार्यरत आहेत व त्यांच्या दहा हजार पेक्षा जास्त योजनांमधून ६ कोटी लोकांनी रु २० हजार कोटीपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे. पण महाराष्ट्रातल्या कोणत्याही शहरी अथवा निमशहरी भागात म्युचुअल फंडाच्या खरेदी संबंधात अजूनही खूपच शिथिलता दिसते. तसेच या संबंधात जागरूकता निर्माण केलेल्या प्रयत्नांना सुद्धा म्हणावे तेवढे यश मिळाले नाही असा गेले ३ वर्षांचा माझा स्वता:चा अनुभव आहे.
बरेच लोक अजूनही RD (आवर्ती ठेव), पिग्मी यामध्ये बचत करताना दिसतात पण ती बचत गुंतवणुकीत रुपांतरीत करण्यासाठी SIP करा असे सांगितल्यास थोडासा चेहऱ्यावर नकार दर्शविला जातो. याचे एक कारण कदाचित “Read All Documents Carefully Before Investing” अशी सूचना दर्शविणाऱ्या म्युचुअल फंडांच्या जाहिरातीत असू शकते.
म्युचुअल फंडहाउसना सेबीने जरी वरील सूचना देणे बंधनकारक केले असले तरी म्युचुअल फंडामध्ये प्रत्येक गोष्ट पारदर्शक ठेवण्याचेही बंधनकारक केले आहे.
फंड व्यवस्थापनासाठी येणारा खर्च जास्तीच जास्त किती असावा यावर सुद्धा सेबीची करडी नजर असते.
गुंतवणूकदाराला त्याने आपल्या फंडासंदर्भात कुठलाही व्यवहार कुठूनही करण्याची मुभा कोणताही जादा खर्च न करता देण्यात आली आहे.
म्युचुअल फंडाचे statement, सध्याची स्थिती दर्शविणारा अहवाल कोणत्याही क्षणाला वेबसाईट किंवा मोबाईल अॅप द्वारे एकाक्षणात उपलब्ध होउ शकतो. ज्या लोकांकडे अशाप्रकारची सुविधा नाही अशांना सुद्धा Physical statement दरमहिन्यांनी / सहा महिन्यांनी त्यांच्या निवासी पत्त्यावर पाठविले जाते.
तसेच Unclaimed निधींच्या बाबतीत सुद्धा वारसदार शोधून संबंधित लाभदारकाला ते पैसे मिळवून देण्याची जबाबदारी फंड हाउस घेते. बऱ्याच कुटुंबियांच्या बाबतीत पूर्वी बालभविष्य योजनेअंतर्गत कोणीतरी नातेवाईकांनी गुंतवणूक केलेली असते, या गुंतवणुकीचा कागदी पुरावा मुल मोठे झाल्यानंतर त्या बालकाकडे किंवा कुटुंबियांकडे नसतो पण अशाही कुटुंबियांना त्यांच्या गुंतवणुकीचा योग्य परतावा फंड हाउस देते.
यासर्व बाबींचा सखोल अभ्यास ,आपल्या बचतीचे रुपांतर गुंतवणुकीत करण्यासाठी गुंतवणूकदाराने करून आवश्यक त्या ठिकाणी सल्लागाराची मदत घेऊन संपत्तीवृद्धी साठी करावा असे आवाहन धनलाभ तर्फे करण्यात येत आहे. या अनुषंगाने PAN कार्ड व आधार कार्ड सल्ल्ग्न करण्याची शासनाने केलेली सक्ती आपल्या सर्वांच्या फायद्याची आहे असेही मत ‘धनलाभ’ टीम तर्फे व्यक्त करण्यात येत आहे.