केंद्र सरकारचे कामगार कायदे आणि खासगीकरणाला विरोध करण्यासाठी देशभरातील कामगार संघटनांनी दोन दिवसीय राष्ट्रीय संपाची हाक दिली आहे. येत्या २८ आणि २९ मार्च रोजी हा संप होणार आहे. या संपात बँक कर्माचारी आणि अधिकाऱ्यांचे नेतृत्व करणाऱ्या कामगार संघटना सहभागी होणार आहेत. दरम्यान नियोजित संपापूर्वी शनिवार २६ मार्च रोजी चौथा शनिवार असल्यानं सलग चार दिवस बँका बंद राहण्याची शक्यता आहे. यामुळे ग्राहकांना

मनस्ताप टाळण्यासाठी उद्या गुरुवार आणि परवा शुक्रवार या दोन दिवसांत बँकेशी संबधित कामे उरकावी लागतील.

अभिप्राय द्या!