पॅन-आधार लिंक करण्याची शेवटची तारीख

पॅनशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२२ आहे. यापूर्वी पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०२१ होती. तर तुम्ही आता हे काम ३१ मार्चपूर्वी पूर्ण करावे. जर तुम्ही पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक केले नाही तर याचा तुम्हाला दंड भरावा लागेल असे नाही तर तुमचे पॅन कार्ड देखील पूर्णपणे निष्क्रिय होऊ शकते.

PPF, NPS, SSY खाते सक्रिय करण्याची शेवटची तारीख

PPF, NPS, सुकन्या समृद्धी खाते (SSY) सारख्या काही गुंतवणुकींना सक्रिय ठेवण्यासाठी प्रत्येक आर्थिक वर्षात खात्यात किमान रक्कम जमा करणे आवश्यक आहे. PPF, SSY, NPS या योजनाच्या खात्यामध्ये पुरेशी रक्कम जाम केली नाही तर तुमचे ही खाती बंद होतील आणि नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी ती नियमित किंवा अनफ्रीझ करावी लागतील. खाते पुन्हा सक्रिय करण्यासाठी वेळ लागू शकतो आणि तुम्हाला दंड देखील भरावा लागू शकतो. हे टाळण्यासाठी खात्यात किमान रक्कम वेळेत जमा करावी.

एका आर्थिक वर्षात PPF खात्यासाठी किमान वार्षिक योगदान ५०० रुपये आहे. जर तुमच्या खात्यात किमान ५०० रूपये जमा झाले नसतील तर ते खाते बंद केले जाऊ शकते आणि पुढे पैसे काढण्याची परवानगी दिली जाणार नाही. NPS खातेधारकांना किमान १००० रुपये योगदान देणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे, सुकन्या समृद्धी खाते सक्रिय ठेवण्यासाठी, प्रत्येक आर्थिक वर्षात किमान २५० रुपये जमा करणे आवश्यक आहे.

गृहकर्जावर अतिरिक्त वजावट

आयकर कायद्याच्या कलम ८०EEA अंतर्गत गृहकर्जावर (आयकर कायद्याच्या कलम २४ अंतर्गत २ लाखांपेक्षा जास्त) भरलेल्या गृहखरेदीदाराच्या व्याजासाठी १.५ लाख रुपयांच्या अतिरिक्त कपातीचा लाभ ३१ मार्च २०२२ पर्यंत उपलब्ध आहे. तुम्ही कलम ८०EEA अंतर्गत गृहकर्जासाठी पात्र असल्यास, तुम्ही योजना संपण्यापूर्वी त्याचा लाभ घ्यावा.

आर्थिक वर्ष २०२१- २२ साठी कर वाचवण्याची अंतिम तारीख

तुम्ही अद्याप कर नियोजन पूर्ण केले नसेल किंवा १.५ लाख रुपयांची कलम ८०C मर्यादा पूर्ण केली नसेल किंवा अजून कोणताही कर लाभ घेतला नसेल, तर तुम्हाला घाई करणे आवश्यक आहे कारण याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२२ आहे. हे विशेषतः त्यांच्यासाठी आहे ज्यांनी जुन्या कर प्रणालीची निवड केली आणि नवीन कर प्रणालीसह जाण्यास सहमत नाही. जुन्या कर प्रणाली अंतर्गत, तुम्हाला आयकर कायद्याच्या अध्याय VI A अंतर्गत प्राप्तिकर लाभ मिळू शकतात. PPF, लाइफ इन्शुरन्स, ELSS ते NSC, टॅक्स सेव्हिंग बँक डिपॉझिट इत्यादींमधून निवडण्यासाठी अनेक पर्याय आहेत.

जरी तुम्ही कलम ८०C मर्यादा आधीच संपवली असेल, तरीही तुम्ही आरोग्य विमा पॉलिसी धारण करून कर वाचवू शकता. तुम्ही पालकांसाठी भरलेला प्रीमियम देखील कपातीसाठी पात्र आहे. सध्या ६० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्यांसाठी ही २५,००० रुपये आहे, तर ज्येष्ठ नागरिकांसाठी ती ५०, ००० रुपये आहे. यापैकी कोणत्याही योजनेसाठी भरलेला प्रीमियम कलम ८०D अंतर्गत एकूण उत्पन्नातून वजा केला जातो.

विलंबित रिटर्न भरण्याची शेवटची तारीख

आर्थिक वर्ष २०२०- २१ किंवा मूल्यांकन वर्ष २०२१- २२ साठी विलंबित रिटर्न भरण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२२ आहे. या तारखेपर्यंत तुम्ही आयटीआर दाखल केली गेली नसेल तर तुम्हाला १०,००० रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो, तर ज्यांचे वार्षिक उत्पन्न ५ लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्यांना १००० रुपयांचा दंड भरावा लागू शकतो.

प्रधानमंत्री वय वंदना योजना

तुम्हाला नियमित मासिक उत्पन्नासाठी निधी जमा करायचा असेल, तर तुम्ही प्रधानमंत्री वय वंदना योजनेत गुंतवणूक करू शकता. PMVVY फक्त LIC India मध्ये उपलब्ध आहे आणि आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी PMVVY योजना दरमहा देय ७.४० टक्के खात्रीशीर पेन्शन प्रदान करते.

अभिप्राय द्या!