थर्ड पार्टी मोटार इन्शुरन्सच्या प्रीमियममध्ये होणारी दरवाढ लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. यापू्र्वी प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार येत्या एक एप्रिलपासून ही दरवाढ प्रस्तावित होती. केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने २१ मार्चला प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेत थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये बदलाचे संकेत दिले होते. ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून तीस दिवसांनी नव्या दरांचा विचार करण्यात येणार असल्याचे त्यात नमूद करण्यात आले होते. याचा अर्थ प्रस्तावित बदलांची अंमलबजावणी एक एप्रिलपासून होणार नाही.
- Post published:March 26, 2022
- Post category:घडामोडी
- Post comments:0 Comments