रुची सोया इंडस्ट्रीज लिमिटेडच्या फॉलो ऑन पब्लिक ऑफरला गुंतवणूकदारांनी प्रतिसाद दिला आहे. ही आॅफर खुली दोन दिवसात १६ टक्के शेअरसाठी मागणी नोंदवण्यात आली. सोमवार २८ मार्च २०२२ रोजी ही आॅफर बंद होणार आहे.
फाॅलो आॅन पब्लिक आॅफरमधून रुची सोया जवळपास ४३०० कोटींटे भांडवल उभारणार आहे. यासाठी कंपनीने प्रती शेअर ६१५ ते ६५० रुपये किंमत पट्टा निश्चित केला आहे. हा प्रस्ताव गुरुवार २४ मार्च २०२२ रोजी खुला झाला. शेअर बाजाराच्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळपर्यंत ७३.२१ लाख शेअरसाठी गुंतवणूकदारांनी बोली प्रस्ताव सादर केले आहेत.