म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना फंड योजनांमधील गुंतवणूक सुरुच ठेवण्यासाठी ३१ मार्च २०२२ पूर्वी पॅन-आधार लिंक करावे लागणार आहे. केंद्र सरकारने पॅन-आधारसाठी ३१ मार्च २०२२ ही अंतिम मुदत दिली आहे. या तारखेपर्यंत पॅन-आधार जोडले नाही तर गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता येणार नाही.
पॅन-आधार न जोडल्यास पॅनकार्ड निष्क्रिय होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे गुंतवणूक प्रक्रिया खंडीत होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय नव्याने म्युच्युअल फंडात गुंतवणूक, रिडम्प्शन, एसआयपीमधील गुंतवणूक रोखली जाऊ शकते. त्यामुळे गुंतवणूकदारांनी ३१ मार्चपूर्वी पॅनकार्ड आधार कार्ड जोडण्याची प्रक्रिया करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.