टाटा कॉफीचा मळे आणि लागवड व्यवसाय टाटा कन्झ्युमर प्रॉडक्टच्या संपूर्ण मालकीच्या टाटा बीव्हरेजेस अँड फूड्स लिमिटेडमध्ये विलीन केला जाईल. तर टाटा कॉफीचा उर्वरित व्यवसाय टाटा कन्झ्युमर प्रॉडक्टमध्ये विलीन करण्यात येणार आहे. या विलीनीकरणाच्या योजनेअंर्तगत टाटा कॉफीच्या भागधारकांना आता टाटा कन्झ्युमर प्रॉडक्टचे समभाग प्राप्त होणार आहेत. ज्या भागधारकाकडे टाटा कॉफीचे १० समभाग असतील त्यांना टाटा कन्झ्युमर प्रॉडक्टचे ३ समभाग प्राप्त होणार आहेत.

समभागात तेजी

टाटा कन्झ्युमर प्रॉडक्टमध्ये टाटा कॉफीच्या विलीनीकरणाच्या वृत्तामुळे बुधवारच्या सत्रात टाटा कॉफीचा समभाग १८.३० रुपये म्हणजेच ९.३२ टक्क्यांच्या वाढीसह २१४.५५ रुपयांवर स्थिरावला. दिवसभरातील सत्रात समभागाने २२१.२० रुपयांचा उच्चांक गाठला होता. तर टाटा कन्झ्युमर प्रॉडक्टच्या समभागात ३.०५ टक्क्यांची वाढ झाली. तो दिवसअखेर २२.६५ रुपयांच्या वाढीसह ७६५.८५ रुपयांवर स्थिरावला. त्याने बुधवारच्या सत्रात ७८२.७५ रुपयांच्या उच्चांकाला स्पर्श केला होता.

अभिप्राय द्या!