गृहकर्ज पुरवठादारांपैकी आघाडीची वित्त संस्था असलेल्या हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स काॅर्पोरेशनचे (एचडीएफसी) HDFC बँकेत विलीनीकरण होणार आहे. एचडीएफसी बँकेच्या संचालक मंडळाने या विलीनीकरणाला मंजुरी दिली असल्याचे कंपनीनं शेअर बाजाराला कळवले आहे. या घोषणेनंतर आज सोमवारी शेअर बाजारात HFFC bank आणि एचडीएफसी या दोन्ही कपन्यांच्या शेअरमध्ये मोठी उसळी दिसून आली.

एचडीएफसीच्या उपकंपनी असलेल्या एचडीएफसी इन्व्हेस्टमेंट लिमिटेड आणि एचडीएफसी होल्डिंग्ज लिमिटेड या दोन्ही कंपन्या एचडीएफसी बँकेत विलीन करण्यात येतील. विलीनीकरणाच्या प्रस्तावाला नुकताच एचडीएफसीच्या संचालक मंडळाने मंजुरी दिली. हे विलीनीकरण दोन्ही बरोबरीच्या कंपन्यांचे एकत्रीकरण असल्याचे मत एचडीएफसी अध्यक्ष दिपक पारेख यांनी सांगितले.

अभिप्राय द्या!