यू ग्रो कॅपिटल लिमिटेडने १०० कोटी रुपयांचे मानांकित, सुरक्षित, उच्च, सूचीबद्ध, हस्तांतरणीय, रीडीमेबल, अपरिवर्तनीय डिबेंचरची घोषणा केली आहे. हे एनसीडी बीएसई आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध केले जाणार आहेत. यात प्रत्येकी १,००० रुपये दर्शनी मूल्याचे ५० कोटी आणि ओव्हर सब्स्क्रीप्शन पर्यायासह एकूण इश्यू आकार १०० कोटी रुपयांपर्यंत आहे. हा इश्यू गुरुवारी ०७ एप्रिल २०२२ रोजी खुला होईल आणि इश्यू ०६ मे २०२२ रोजी बंद होईल.

कंपनीचे इक्विटी शेअर्स ‘एनएसई’ आणि ‘बीएसई’वर सूचीबद्ध आहेत. कंपनीने निधीचा विनियोग (i) एकूण अंदाजे निव्वळ रकमेच्या किमान ७५% पुढील कर्ज, वित्तपुरवठा आणि कंपनीच्या विद्यमान कर्जाचे व्याज आणि मुद्दल यांच्या परतफेडीसाठी वापरण्याचा प्रस्ताव दिला आहे आणि (ii) एकूण अंदाजे निव्वळ २५% पर्यंत सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्देशांसाठी. अॅक्युईट रेटिंग्ज अँड रिसर्च लिमिटेडच्या ४ मार्च २०२२ रोजीच्या त्यांच्या रेटिंग पत्राद्वारे २०० कोटी रुपये किंमतीसाठी इश्यू अंतर्गत जारी केल्या जाणाऱ्या प्रस्तावित एनसीडीला A+ (ACUITE A Plus) (आउटलुक: स्टेबल) असे मानांकन देण्यात आले आहे.

अभिप्राय द्या!