वैयक्तिक गुंतवणूकदारांना प्रारंभिक समभाग विक्रीमध्ये (आयपीओ) आता नव्या युगाच्या रोकडरहित, कार्डरहित आणि संपर्करहित देयक व्यवहाराचा आधुनिक पर्याय अर्थात ‘युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय)’च्या माध्यमातून पाच लाख रुपयांपर्यंतची बोली लावता येणार आहे, असे भांडवली बाजार नियामक ‘सेबी’ने मंगळवारी परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले.

वैयक्तिक गुंतवणूकदारांना दलाली मंच, डिपॉझिटरी पार्टिसिपंट (डीपी), भागविक्रीचे निबंधक, समभाग हस्तांतरण एजंट यांच्याकडे समभाग विक्रीसाठी अर्ज करताना बोलीसह पैशांचा भरणा करण्याचा पर्याय म्हणून ‘यूपीआय आयडी’ सादर करता येतो. तथापि या माध्यमातून गुंतवणुकीची कमाल मर्यादा सध्याच्या दोन लाख रुपयांवरून पाच लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. येत्या १ मेपासून आणि त्यानंतर बाजारात येणाऱ्या आयपीओसाठी ही नवीन मार्गदर्शक तत्त्वे लागू असतील, असे सेबीने त्यांच्या परिपत्रकात म्हटले आहे.

अभिप्राय द्या!