भारत-पाकिस्तान सीमारेषेवर वाढलेल्या तणावाचा शेअर बाजारावर काल (बुधवार) परिणाम दिसून आला. त्यामुळे सकाळच्या सत्रात सकारात्मक असलेल्या निर्देशांकांमध्ये दुपारच्या सत्रात मोठी घसरण झाली. परिणामी शेअर बाजारात दिवसभर चढ-उतार सुरू होते. अखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक .सेन्सेक्स ६४ अंशांच्या घसरणीसह ३०३०१ पातळीवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 26 अंशांच्या घसरणीसह ९३६० पातळीवर व्यवहार करत बंद झाला.
मिडकॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांच्या शेअर्समध्ये आज मोठ्या प्रमाणावर विक्रीचा मारा सुरू होता. क्षेत्रीय पातळीवर बँकिंग, मेटल, फार्मा, रिअल्टी, कॅपिटल गुड्स, कंज्यूमर ड्युरेबल्स आणि पॉवर कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाल्याने निर्देशांकात घसरण झाली.
आज मुंबई शेअर बाजारात टाटा मोटर्स , , गेल, अदानी पोर्ट्स, बीपीसीएल, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि टीसीएस यांचे शेअर्स सर्वाधिक वधारले होते. तर बॅंक ऑफ बडोदा, एल अँड टी, अरबिंदो फार्मा, भारती इन्फ्राटेल, एसीसी, भेल, सिप्ला, डॉ रेड्डी आणि कोल इंडियाच्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली.

अभिप्राय द्या!

Close Menu