एडलवाईस हाऊसिंग फायनान्स लिमिटेडने (इएचएफएल) आज १००० रुपये दर्शनी मूल्यासह १५० कोटी (बेस इश्यू) अपरिवर्तनीय रोखे (एनसीडी) सार्वजनिक विक्रीला आणण्याचे जाहीर केले. सरासरी एकूण ३०० कोटींचा अतिरिक्त भरणा करण्याचा पर्याय खुला असेल. हा इश्यू ६ एप्रिल २०२२ रोजी उघडेल आणि लवकर बंद करण्याच्या पर्यायासह २६ एप्रिल २०२२ रोजी बंद होईल. या ‘एनसीडी’ची मुंबई शेअर बाजारात नोंदणी करण्यात येईल.

या योजनेत निश्चित कूपन असलेल्या आणि वार्षिक, मासिक आणि संचयी व्याज पर्यायासह २४ महिने, ३६ महिने, ६० महिने आणि १२० महिने कालावधी असलेल्या एनसीडीच्या दहा मालिका आहेत. ‘एनसीडी’साठी कूपन प्रती वर्ष *८.५० टक्के ते ९.७० टक्के परतावा मिळेल.

या इश्यूअंतर्गत जारी केल्या जाणाऱ्या एनसीडीला क्रिसिल एए- मानांकन दिले आहे.

अभिप्राय द्या!