सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये  PPF  investment करणे पूर्णपणे सुरक्षित आहे. बहुतेक लोक कर बचतीसाठी पीपीएफमध्ये गुंतवणूक करतात. पीपीएफमध्ये गुंतवलेल्या रकमेवर चांगला परतावाही मिळतो.PPF  दीर्घ मुदतीसाठी गुंतवता येऊ शकतो, ज्यात जास्तीत जास्त एक लाख पन्नास हजार रुपये आणि किमान एक हजार रुपये वार्षिक गुंतवले जाऊ शकतात. तुम्ही तुमच्या सोयीनुसार वार्षिक आणि मासिक दोन्ही पीपीएफमध्ये गुंतवणूक करू शकता.

पगारधारी लोक आर्थिक वर्षाच्या शेवटी पीपीएफ खात्यात गुंतवणूक करतात. तज्ज्ञांच्या मते, या योजनेत जास्त परतावा मिळविण्यासाठी गुंतवणूकदारांनी आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच १ ते ४ एप्रिल दरम्यान गुंतवणूक करावी.

पीपीएफच्या नियमांनुसार, पीपीएफ खात्यात गुंतवलेल्या रकमेवर ५ तारखेपासून महिनाअखेरीपर्यंत जमा केलेल्या किमान शिल्लक रकमेवर व्याज मिळते. पीपीएफ खात्यातील व्याजाची गणना दरमहा केली जाते, पण खात्यातील व्याज आर्थिक वर्षाच्या शेवटी जमा केले जाते. तुम्ही ५ एप्रिलपूर्वी या खात्यात पैसे जमा केले, तर तुम्ही त्या महिन्याच्या व्याजासाठी देखील पात्र असाल. जर तुम्ही ५ तारखेनंतर पैसे जमा केले, तर तुम्हाला व्याजाचे नुकसान सहन करावे लागेल.

अभिप्राय द्या!