NSE चा आय. पी. ओ. म्हणजेच शेअर मार्केट मधील  एक ” बाहुबली “

एकीकडे ‘कट्टप्पाने बाहुबलीला का मारले?’ या चर्चेला ऊत आलेला असताना, शेअर बाजारातील गुंतवणूकादारांना मात्र राष्ट्रीय शेअर बाजाराच्या(एनएसई) दहा हजार कोटी रुपयांच्या प्राथमिक समभाग विक्रीची(आयपीओ) प्रतीक्षा आहे.

“आयपीओचे लॉन्च आणि बाहुबली सिनेमात बऱ्यापैकी साम्य दिसून येते. भांडवली बाजारातदेखील सिनेमांप्रमाणे कथा, संहिता, नाट्य, वितरण आणि प्री-लॉन्च बिल्ट-अप समाविष्ट असते,” असे गुंतवणूक सल्लागार आणि संशोधन संस्था,चे संस्थापक श्री. अरुण केजरीवाल यांनी सांगितले.आयपीओमध्ये देखील लाईट-कॅमेरा-अॅक्शन सारखी स्थिती असते. जेव्हा सेबीकडून संमती मिळते, तेव्हा आमच्यासाठी दिवे म्हणजे लाईट पेटतात. जेव्हा रोड-शोला सुरुवात होते तेव्हा कॅमेरा आणि अॅक्शनचा आरंभ होतो,

ज्याप्रमाणे एखादा  सिनेमा प्रेक्षकांना दाखवला जातो, त्याप्रमाणे आयपीओ हे विश्लेषक आणि ब्रोकिंग कम्युनिटीकडून गुंतवणूकदाराला दाखवले जातात.त्यामध्ये किंमत पट्टा आणि आकडेमोडीबाबत असणारे विवेचनरुपी मसाला टाकला जातो.

IPOच्या प्रकारात गुंतवणूकदार आणि विश्लेषक  मुल्यांकनावर,  / आयपीओच्या तारखांवर चर्चा करतात.  हे म्हणजे अलीकडे सिनेमाला चर्चेद्वारे मिळणाऱ्या यशाप्रमाणेच आहे.

डी मार्टचे गुंतवणूकदार मालामाल झाल्याने आता लोकांच्या नजरा   एनएसई आयपीओकडे  आहेत !! यासाठी ३० लाखांहून अधिक अर्ज येतील, असा  अंदाज आहे. म्हणूनच या IPO ला ” बाहुबली ” म्हटले जात आहे !!

अभिप्राय द्या!