आर्थिक नियोजनाचे महत्व
आर्थिक नियोजनाच्या दृष्टीने गेली दोन वर्षे अनेकांसाठी थोडीफार कठीण ठरली आहेत. lockdown,पगार कपात, व्यवसायावरील बंधने, वैद्यकीय खर्च या कारणास्तव अनेकांना आर्थिक फटका बसला आहे.,आणि त्यामुळेच आर्थिक शिस्तीचे महत्व समजले आहे.त्या दृष्टीने आर्थिक वर्षाच्या सुरुवातीच्या कालावधी हा खूप महत्वाचा ठरतो. वर्षभर आर्थिक तणाव राहू नये या दृष्टीने अर्थवर्षाच्या पहिल्या महिन्यापासून काही महत्वाच्या बाबीवर लक्ष केंद्रीत केल्यास कोणताही आर्थिक तणाव येऊ शकतात नाही. यासंबधात महत्वाच्या बाबी पुढीलप्रमाणे:-
१. खर्चावर नियंत्रण – आपला खर्च कसा होत आहे यासाठी खर्च होणारा प्रत्येक पैसा कुठे खर्च होतो हे लिहून ठेवल्याने अनावश्यक बाबीवरील खर्च टाळता येणे शक्य होते. यासाठी अनेक लहान मोठी app उपलब्ध आहेत. या app मधून घरखर्च,प्रवास खर्च किंवा इतर लहानसहान खर्चाच्या बाबींची नोंद करता येते व त्याचा महिन्याच्या अखेरीला आढावा घेता येतो.
२. नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपल्या आर्थिक ध्येयाचे पुनरावलोकन करणे हे खूप महत्वाचे असते. घसरत्या व्याजदरामुळे आपली गुंतवणूक कशी करावी व जास्त परतावा कसा मिळवावा यासाठी एखाद्या तज्ञ आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेणे उचित ठरू शकते.
३. गुंतवणुकीचा पोर्टफोलिओ तपासणेही हितावह असते- Equity किंवा सोने यामधील गुंतवणूक Rebalance करण्याला ही खूप महत्व असते.
४.विमा योजनांचे पुर्नलोकन :– आरोग्य विमा ,वाहन विमा किंवा मुदतीचा विमा यामध्ये वर्षगणिक किंबहुना दिवसागणिक खूप बदल होत असतात.त्याचा तौलनिक अभ्यास करून आपल्याला कोणत्या योजना फायदेशीर ठरतात याचे अवलोकन केल्यास आपला खूप फायदा होवू शकतो. यासर्व विम्याचे प्रीमियम भरण्यासाठी लिक़्विड ( liquid fund) फंडा तील SIP सुद्धा फायदेशीर होऊ शकते.
५. कर नियोजन :- आजपर्यत अनेकांनी कर नियोजन करण्यासाठी LIC Policy आणि PPF याबाहेर क्वचितच विचार केलेला असतो. पण ELSS (इक्विटी लिंक सेविंग स्कीम) NPS ( राष्ट्रीय पेन्शन योजना) APY ( अटल पेन्शन योजना) यासारख्या अनेक योजना सरकारने बाजारात उपलब्ध केलेल्या आहेत.त्यामध्ये गुंतवणूक करणे अत्यंत सोपे आहे.त्याची statement सुद्धा smart फोनमध्ये उपलब्ध होऊ शकतात.आणि हे सर्व वर्षाच्या सुरुवातीलाच केल्यास मार्च महिन्यात होणारी धावपळ आपण थांबवू शकतो. तसेच वर्षाच्या सुरुवातीला कुठल्या योजनेत किती गुंतवणूक करावयाची ठरवल्यास अखेरीला किती अधिक गुंतवणूक करणे आवश्यक आहे.याचाही आढावा सहजपणे घेवू शकतो.
वरील गोष्टी वर्षाच्या सुरुवातीच्या पहिल्या महिन्यातच केल्यास कोणताही आर्थिक तणाव येणार नाही आणि वर्ष अखेरीली होणारी धावपळ सहजपणे थांबू शकेल.

अभिप्राय द्या!