मोठ्या आशेने LICच्या IPOमध्ये पैसे लावणाऱ्या गुंतवणूकदारांची आज निराशा झाली. देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या एलआयसीचा शेअर आज बाजारात सुचिबद्ध (लिस्ट) झाला. एलआयसीचा शेअर डिस्काउटसह शेअर बाजारात लिस्ट झाला. मुंबई शेअर बाजारात तो ८६७.२० रुपये म्हणजे ८.६२ टक्के डिस्काउटसह लिस्ट झाला. याचा इश्यू प्राइस ९४९ रुपये इतका होता. याचा अर्थ गुंतवणुकदारांना एका शेअरमागे ८१.८० रुपयांचा तोटा झाला. राष्ट्रीय शेअर बाजारात हा शेअर ८.११ टक्के डिस्काउटसह ८७२ रुपयांना लिस्ट झाला.

प्राथमिक भागविक्रीची (आयपीओ) प्रक्रिया पूर्ण केलेल्या एखाद्या कंपनीचा शेअर बाजारातील अधिकृत प्रवेश म्हणजे ती कंपनी त्या शेअर बाजारात सूचिबद्ध होणे अर्थात त्या कंपनीचे लिस्टिंग होणे होय. लिस्टिंग होणे ही त्या कंपनीच्या वृद्धीसाठी अत्यंत महत्त्वाची घटना मानली जाते.

अभिप्राय द्या!