Fix Maturity Plan (फिक्स मॅच्युरिटी प्लॅन )
सध्याच्या अस्थिर बाजारामध्ये बरेच लोक गुंतवणूक करण्यासाठी धजावत नाहीत.
कमी कालावधीसाठी शेअर बाजार किंवा तशाच प्रकारच्या म्युच्युअल फंडामध्ये सुद्धा गुंतवणूक करणे धोकादायक होऊ शकते. अशा वेळी बरेच लोक वेगवेगळ्या AMC तर्फे नव्याने सुरु केलेल्या Fix Maturity Plan कडे वळताना दिसतात.
प्रत्यक्षात Fix Maturity plan म्हणजे अल्प किंवा मध्यम मुदतीची *कर्जरोखे प्रकारातील close ended योजना असते. * बऱ्याच लोकांना ही योजना म्हणजे *निश्चित व्याज मिळणारी योजना वाटते. * पण प्रत्यक्षात यामध्ये गुंतवणूकीचा कालावधी निश्चीत असतो पण *व्याजदर निश्चीत नसतात. * फक्त अंदाजे किती व्याज मिळू शकते हे सांगितले जाते. यामध्ये (क्रेडीट रीस्क) Credit Risk आणि Liquidity Risk राहतेच. याची मुदत १५ दिवसापासून ५ वर्षा पर्यंतची असू शकते. यामध्ये मुदतीपूर्वी आधी बाहेर पडल्यास Exit load देणे क्रमप्राप्त राहते. यामध्ये ३ वर्षाहून अधिक अवधीसाठी गुंतवणूक केल्यास Indexsession चा लाभ घेवून कराचे प्रमाण कमी करता येते.
पण गुंतवणूक करताना कोणत्या AMC तर्फे कोणते फिक्स म्युच्युरीटी प्लान (Fix Maturity Plan ) उपलब्ध आहेत याचा तौलनिक अभ्यास करून गुंतवणूक करणे जास्त हितावह ठरू शकते आणि त्यासाठी एखाद्या तज्ञ सल्लागाराचा सल्ला घेणे सुद्धा हितावह असते.
यासंबंधी अधिक माहितीसाठी आपण आमच्या कार्यालयाशी संपर्क साधू शकता !
प्रदीप जोशी

अभिप्राय द्या!