पेटीएम (PAY THROUGH MOBILE P T M ) आयपीओ नोंदणी नंतर गडगडला

ONE 97 COMMUNICATIONS ही भारतामधील एक लीडिंग मोबाइल अँप द्वारे बँकिंग सेवा देणारी सिस्टीम आहे जी ग्राहक तसेच व्यापारी वर्ग वापरतात. 2009 साली कंपनीने फर्स्ट डिजिटल मोबाईल पेमेंट प्लॅटफॉर्म म्हणजेच पेटीएम ॲप सुरू केले आहे याद्वारे ग्राहकांना कॅशलेस पेमेंट करता येते तसेच त्यांना कॅशलेस ट्रांजेक्शन द्वारा मोबाईल फोन रिचार्ज करणे, बिल भरणे, तसेच बँकिंग सर्विसेस घेणे, तिकीट खरेदी करणे इत्यादी सेवा घेता येतात.

या कंपनीने नुकताच फार मोठा आयपीओ आणला होता जो एकंदरीत अठरा हजार कोटी रुपयांचा होता व तो 8 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर 2021 रोजी आलेला होता ज्याची किंमत 2150 रुपये होती व एका शेअरचे दर्शनी मूल्य एक रुपया आहे.

गुरुवारी 18 नोव्हेंबरला या आयपीओचे म्हणजे प्राथमिक भाग विक्रीचे दोन्ही स्टॉक एक्सचेंज वरती लिस्टिंग झाले आहे म्हणजेच नोंदणी झाली आहे.

नोंदणी होतानाच हा शेअर 9%त्याच्या आयपीओ किमतीपेक्षा खाली लिस्ट झाला म्हणजेच डिस्काउंटने लिस्ट झाला व त्यानंतर तो सतत खालीच राहून शेवटी 1560 रुपयेला बंद झाला म्हणजेच त्याच्या आयपीओ किमतीपेक्षा 27 टक्के डिस्‍काउंट म्हणजे कमी होऊन तो बंद झालेला आहे.

कदाचित भारतीय इतिहासामधील-स्टॉक मार्केटमधील हा पहिलाच आयपीओ असेल की जो इतक्या जोरात आपटला आहे तसेच हा सर्वात मोठा आयपीओ होता. जो रिलायन्स पॉवर व ऑल इंडिया नंतरचा सर्वात मोठा आयपीओ होता. हा एक आयपीओ लोकप्रिय होता व ज्यास बऱ्याच प्रसारमाध्यमान्नी किंवा स्वतः पेटीएम ने बरीच प्रसिद्धी अगोदर दिली होती परंतु त्याचे बाजार मूल्य आज 27%ने कमी झालेले आहे व या बाबतीत गेले दोन तीन दिवस खूप मोठा उहापोह झाला आहे व याची दखल खुद्द सेबीने सुद्धा घेतलेली आहे.

ह्या आयपीओमुळे रिटेल भागधारकांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. सोमवारी म्हणजे 22 -नोव्हेंबर-2021 रोजी याचे काय होईल हे काही सांगता येत नाही कारण काही प्रख्यात विश्लेषकांनी याची किंमत बाराशे रुपये पर्यंत येऊ शकते असे अंदाज वर्तवले आहे.

आता आपण मूळ प्रश्नाकडे जाऊ या. सर्वांना हा प्रश्न पडला आहे की याची लिस्टिंग नंतर किंमत एवढी का गडगडली ?

खालील कारणे आहेत.

१. अत्यंत महागडा असा किंमत पट्टा. पेटीएम ने 2150 रुपये असा अत्यंत महागडा किंमत पट्टा ठेवलेला होता. जो या अगोदर अंदाजे सतराशे रुपये होता तो त्यांनी रिवाईस करून 2150 रुपये असा ठेवला होता.

२. पेटीएम यास ऍमेझॉन पे, गुगल पे, फोन पे ॲप या सर्वांकडून प्रखर स्पर्धा होत आहे तरीसुद्धा त्यांनी या स्पर्धेचा विचार न करता एवढी मोठी किंमत ठेवली जी किंमत सहाजिकच सामान्य माणसाला लक्षात आले आहे की ती जास्त आहे परंतु सामान्य माणसाचा विचार न करता आपल्याच धुंदीत असलेल्या काही लोकांनी याची किंमत 2150 रुपये ठेवली.

३. ही कंपनी गेले आठ वर्ष सतत तोट्यात मध्ये आहे कारण ही कंपनी फक्त सेवा देण्यामध्ये आहे यांचे कुठलेही उत्पादन नाही तसेच कंपनीने स्वतः सांगितले आहे की आम्ही कशाप्रकारे फायद्यात येऊ शकतो हे आत्ता तरी सांगणे अवघड आहे त्यामुळे कंपनीकडे भविष्यामध्ये कुठलेही क्लियर कट असे भवितव्य किंवा क्लियर कट असे उपाय नाही की ज्याद्वारे भविष्यामध्ये फायद्यामध्ये येऊ शकेल.

४. हा एवढा मोठा आयपीओ होता परंतु या आयपीओमधील 18 हजार 600 कोटी रुपये मधून दहा हजार कोटी रुपये हे ऑफर फोर सेल यासाठी होते म्हणजेच कंपनीच्या प्रमोटर ने किंवा ज्यांच्याकडे ऑलरेडी पहिले शेअर्स होते त्यांनी त्यांचे शेअर्स विकण्यासाठी हा आयपीओ आणला होता की काय अशी शंका सर्वांना येत होती. कंपनीने भागधारकांना पुढे काय मिळेल याचा विचार न करता फक्त आपले शेअर्स विकायचे आहेत एक विचार मनात पक्का केला असावा.

५. खूप अल्प प्रतिसाद. कंपनीला फक्त आठ हजार कोटी मिळणार होते त्यामुळे सुद्धा अनेक चांगल्या भागधारकांनी तसेच एन आय या (NII) या कॅटेगिरीने या आयपीओकडे पूर्णतः दुर्लक्ष केले व ही कॅटेगरी पूर्णतः भरली गेली नाही. जी कॅटेगिरी भरली गेली ती रिटेल कॅटेगरी होती ज्यांना असे वाटत होते की आपल्याला 10 ते 20% तरी लिस्टिंग मिळेल व त्यातून आपल्याला जे शेअर मिळतील ते आपण विकून टाकू परंतु रिटेलमध्ये जे काही एकंदरीत सबक्रिप्शन जमा झाले त्याच्यामध्ये काही लोकांनी एका पॅन नंबर वरती डबल टिबल एप्लीकेशन केले असावे त्यांचे ते रिजेक्ट झाले व अशाप्रकारे ज्यांनी ज्यांनी आपलिकेशन केले त्यांना प्रत्येकाला हे आयपीओ मिळाला.

६. अजून एक कारण म्हणजे कंपनीचे बिझनेस मॉडेल हे त्रुटी पूर्ण आहे हे अनेक विश्लेषकांनी इंटरनेटवर मांडले होते तसेच कंपनीला स्वतःला काही माहिती नव्हते की आपण नफ्यात केव्हा येणार आहोत त्यामुळे सुद्धा या आयपीओ ला पुढे जाऊन प्रतिसाद मिळणार नाही हे कळत होते.

७. चुकीच्या वेळी केले गेलेले लिस्टिंग. आत्ता बाजार जरी तेजीच्या मोडमध्ये असला तरी मागील महिन्यांमध्ये निफ्टी एकूण 840 पॉईंट कोसळलेला होता. फोरेन इंस्तिच्युशनल इन्वस्टर हे नेट सेलर्स होते. फेडरल रिझर्व व्याज दर वाढवणार या भीतीने ते सेफ गेम खेळत होते व ते नेटसेलर होते तसेच म्युच्युअल फंड स्कीम मध्ये सुद्धा मागील तीन महिन्यांपासून त्यामानाने इतके पैसे येत नव्हते .

८. मागील एक वर्षापासून एकंदरीत 49 आयपीओ आले. त्या आयपीओ द्वारे एक लाख एक हजार करोड रुपये भांडवल उभे केले गेले. परंतु त्यातील 62 हजार 77 कोटी हे फक्त ऑफर फोर सेल द्वारे होते म्हणजेच भाग धारकांचा किंवा आयपीएल मध्ये जे अर्ज करतात त्यांचा कुठलाही विचार न करता फक्त मला माझ्या कडील शेयर्स विकायचे आहेत व मला स्टॉक एक्सचेंजवर लिस्टिंग करायचे आहेत या हेतूने आयपीओ आणला गेला 62 हजार 77 मधले दहा हजार कोटी रुपये तर फक्त पेटीएम आयपीओचे होते. याअगोदर झोमॅटो याने सुद्धा लॉस असून सुद्धा आयपीओ आणला होता व त्यांना चांगला रिस्पॉन्स मिळाला होता परंतु झोमॅटो आयपीओ आल्यानंतर बाजारातील liqudity म्हणजे तरलता कमी झाली. तसेच बाजार हा खाली खाली येत गेला तसेच एफआयआय नेट सेलर होते त्यामुळे सुद्धा पे टी एम आय पी वरती परिणाम झाला. तसेच झोमॅटो आयपीओ हा जरी नुकसानीत किंवा तोट्यात असला तरी त्यांनी त्यांची किंमत त्या मानाने व्यवस्थित ठेवली होती त्यामुळे सुद्धा त्यास बराच चांगला रिस्पॉन्स मिळवून तो आता सुद्धा आयपीओच्या किंमतीच्या वरती आहे.

याचे पुढील भवितव्य आता काय??

ज्यांना ज्यांना पेटीएम चा आयपीओ मिळालेला आहेत त्यांना हा खूप जबरदस्त फटका किंवा तोटा आहे तसेच प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये पेटीएम किंवा स्टोअर्समध्ये पेटीएम ॲप असते याचे दुसरा दूरगामी परिणाम म्हणजे ज्यांना ज्यांना हा फटका बसला आहे ते लोक कदाचित पेटीएम वापरणं बंद करतील किंवा तसा प्रचार करतील.

तसेच लोकांचा आयपीओ वरचा विश्वास कमी होईल. आयपीओ बाबतीत लोकांचे असे मत असते की आयपीओ हा फक्त लिस्टिंग गेन घेण्यासाठी घ्यायचा असतो म्हणजे आयपीओ मिळाला की मला लिस्टिंग गेन मिळणार की मी त्यातून बाहेर पडेल अशाप्रकारे कंपनीचा कुठलाही अभ्यास न करता आयपीओचा कुठलाही अभ्यास न करता येईल तो आयपीओ भरणे असे होत आहे. या प्रकाराला आळा बसू शकेल व जे नवोदित गुंतवणूकदार आहे ते यातून काहीतरी धडा घेतील अशी अपेक्षा आहे.

प्रत्येक येणारा आयपीओ हा चांगलाच असतो असे नाही म्हणून मी माझ्या विद्यार्थ्यांना तसेच माझ्या समूहातील सर्व सदस्यांना खालील वाक्य नेहमी सांगत असतो की “आयपीओ आयपीओ म्हणजे काय? ? तर आयपीओ म्हणजे बाजारातून विकत आणलेला नारळ किंवा घरात आलेली नववधू होय. ज्याप्रमाणे नारळ किती जरी बघुन घेतला तरी घरी आल्यानंतर तो कसा निघेल याची शाश्वती नसते, तसेच घरात आलेली नववधू घरामध्ये आल्यावर ती कशी वागेल, ती घरामध्ये सर्वांशी जुळवून घेईल का? की थोड्या दिवसानंतर दुसरं घर करेल हे आपण लगेच सांगू शकत नाही”

त्याप्रमाणे कंपनी किती जरी चांगली असली व आयपीओला प्रतिसाद कमी जास्त जरी मिळाला तरी लिस्टिंग नंतर कसा वागेल हे जनरली फार कोणी सांगू शकत नाही. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये असे प्रकार झाले आहेत की खूप चांगला प्रतिसाद मिळालेल्या आयपीओ सुद्धा फार चांगलं प्रगती करु शकला नाही तर शीला फोम सारखा आयपीओ ज्यास रिटेलने निम्मा सुद्धा प्रतिसाद दिला नव्हता तो आज तिप्पट झालेला आहे.

पेटीएम सारख्या आयपीओला NII या लोकांनी पूर्णतः पाठ दाखवली कारण NII हे मंडळी आयपीओ मध्ये पैसे भरण्यासाठी आयपीओ फंडिंग द्वारा म्हणजेच कर्ज काढून आयपीओ भरत असतात ज्यावर त्यांना थोड्या दिवसा करता सुमारे आठ ते 12 टक्के व्याज दर द्यावा लागतो त्यांनी दुसऱ्या दिवशीसुद्धा आयपीओ पूर्ण भरला नाही. त्यानुसार जे जाणकार होते त्यांना कळून चुकलं होतं की या आयपीओचे भवितव्य काय होणार आहे त्यामुळेच तिसऱ्या दिवशी सुद्धा दुपारी बारा एक वाजेपर्यंत NII लोकांनी उत्तम प्रकारे सबस्क्रीप्शन न केल्यामुळे सुद्धा ज्यांना हे गणित कळले अशा रिटेल लोकांनी सुद्धा हा आयपीओ भरला नाही व ते यातून वाचले ज्याप्रमाणे आपण बाजारात जाताना सर्व बाजार पहिले फिरून मग भाजी निवडतो त्याप्रमाणे प्रत्येक येणारा आयपीओ हा सुद्धा चांगला असतो असे नाही

ज्या प्रमाणे जर तुम्हाला दहा किलो गहू विकायचे असतील तर तुम्ही असे गहू फुटपाथवर उभे राहून सुद्धा विकू शकतात पण ज्या वेळेला तुम्हाला एक लाख किलो गहू विकायचे असतील तेव्हा तुम्हाला चांगल्या बाजारांमध्ये तसेच ओरडून ओरडून म्हणजे थोडक्यात बेंबीच्या देठापासून ओरडून ओरडून असे गहू विकावे लागतात तरच एवढे मोठे गहू विकले जातात व अशा वेळी हे गहू कसे आहेत हे कोणालाही कळत नसतं व जेव्हा बाजारामध्ये खूप गर्दी असते व खूप लोक एकदम बाजारात येतात तेव्हाच एक लाख किलो गहू हा सहज विकला जातो असाच काहीसा प्रकार हा आयपीओच्या बाबतीत होत आहे जेव्हा मार्केट वर वर जात असते तेव्हाच आयपीओ येत असतो व अशा वेळी गव्हाची प्रत कुठल्या जातीचा गहू आहे हे न बघता बरेचसे रिटेल गुंतवणूकदार येईल तो आयपीओ म्हणजे जो मिळेल तो गहू विकत घेऊन त्याची कणिक बनवत असतात मग त्यानंतर पोळ्या केल्यावर समजतं की हा गहू कसा होता…..

थोडक्यामध्ये गुंतवणूकदारांनी आर्थिक साक्षरता बाळगून किंवा आर्थिक साक्षर झाल्यानंतरच गुंतवणूक करणे हितावह आहे असे या आयपीओ वरून सुद्धा लक्षात येते.

अभिप्राय द्या!