कोरोना व्हायरसच्या चिंतेमुळे जागतिक शेअर बाजारांत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरण होत आहे. गुंतवणूकदार कमालीचे धास्तावलेले आहेत. कोरोना विषाणूमुळे आलेल्या साथीचे जागतिक अर्थकारणावर दीर्घकालीन दुष्परिणाम होईल अशी भीती ही व्यक्त होत आहे. या सर्व गोष्टींचा गुंतवणुकीदारांच्या मानसिकतेवर नकारात्मक परिणाम होत आहे.

तथापि हि जागतिक मंदीची भीती कितीही खरी असली तरी ,इक्विटी गुंतवणूकदार या संकटाचा हि चांगल्या प्रकारे सामना करू शकतात आणि त्यासाठी काय आवश्यक आहे तर संयमित मनोवृत्ती आणि उज्वल भविष्य काळावरचा विश्वास…

सध्याच्या जागतिक अस्थिर आर्थिक स्थितित तर अशा बातम्यांवर आधारित कार्यक्रमांवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा आपण शेअर बाजारात दीर्घकालीन दृष्टिकोन ठेऊन डोळसपणे चांगल्या कंपन्यांमध्ये किंवा चांगल्या म्युच्युअल फंडामध्ये नियमित गुंतवणूक करत राहाणेच महत्वाचे आहे.

अस्थिर शेअर्स बाजारात सर्वात महत्वाची अशी कोणती गोष्ट असते? कोणते असे घटक असतात जे आपल्या पोर्टफोलिओ वर परिणाम करू शकतात?

बाहय घटक बरेच असतात ज्यांवर आपले कोणतेहि नियंत्रण नसते परंतु आंतरिक घटक जे आपल्या नियंत्रणात असतात त्यातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपली मनोवृत्ती. शेयर बाजार जेंव्हा क्रॅश होते तेव्हा आपणच आहोत आपल्या भविष्याचे शिल्पकार असे म्हणल्यास अतिशयोक्ती नसावी . भविष्यातील आपल्या पोर्टफोलिओ मूल्याच्या वृद्धीस किंवा घटीस जबाबदार आपणच असणार असतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी असे का बोलत आहे. पण  वास्तव हेचआहे.

शेअर्स बाजारात चढ आणि उतार असणे बंधनकारक आहे. समुद्राच्या लाटांप्रमाणे सराईतपणे दोन्ही बुल आणि बेअर रॅली येतात आणि जातात. परंतु जर आपण मागील दशकांच्या माहितीचे विश्लेषण केले तर असे लक्षात येईल कि जेंव्हा शेअर बाजारात जबरदस्त चढ-उतार होतात तेंव्हा किरकोळ गुंतवणूकदार स्वतःच्या हाताने आपले अधिक नुकसान करून बसतात. असे गोंधळलेले गुंतवणूकदार दीर्घ काळात कधीही संपत्ती निर्माण करू शकत नाहीत ,उलट ते कष्टाने कमावलेला पैसा गमावतात आणि नंतर झालेल्या तोट्यासाठी इक्विटी मालमत्ता वर्गाला दोष देत बसतात.

म्हणून संयमित मनोवृत्तीने आपण चांगल्या समभागामध्ये गुंतवणूक करणे हिताचे असते ! हे शक्य नसेल तर दोन चार equity फंडामध्ये sip करणे सर्वात सोपे !

अभिप्राय द्या!