तुमची मुलगी काही महिन्यांचीच आहे. जर आता पासून तुम्ही तिच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी चांगल्या आणि योग्य आर्थिक साधनांमध्ये गुंतवणूक केली तर तुमची चिंता दूर होऊ शकेल . गुंतवणुकीचा काही हिस्सा इक्विटी म्युच्युअल फंडात आणि काही हिस्सा डेट मालमत्ता वर्गात टाका .

पण या चिंता आणि तणावाच्या खाली चुकीच्या आर्थिक साधनांमध्ये गुंतवणूक करू नका .

डेट मालमत्ता वर्गासाठी तुमच्या मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजनेतच गुंतवणूक करा. लवकरात लवकर तिच्या साठी हे खाते उघडा . केंद्र सरकारने बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेअंतर्गत हे खास गुंतवणुकीचे साधन मुलींच्या पालकांसाठी उपलब्ध करून दिले आहे . मुलींच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकतात . तुमच्या मुलीचे वय बघता २१ वर्षानंतर जेंव्हा हे खाते म्यॅच्युअर होईल त्यावेळेस नक्कीच मुलीचे लग्नाचे वय नसेल . म्हणूनच तिच्या पदवीत्तर शिक्षणासाठी हे पैसे उपयोगी पडू शकतील .

या योजनेची काही वैशिट्ये :

 • सुकन्या समृद्धी योजनेत मुलीचे वय १० वर्ष होईपर्यंत कधीही उघडता येते.
 • हे खाते उघडल्यापासून २१ वर्षांनंतरच म्यॅच्युअर होते . म्हणजे खाते उडतांना जर मुलीचे वय १ वर्ष असेल तर खाते तिच्या २२ वर्षी म्यॅच्युअर होते. आणि जर तिचे वय ५ वर्ष असेल तर ती २६ वर्षांची झाली कि खाते म्यॅच्युअर होते. म्हणूनच जितक्या लवकर तुम्ही हे खाते उघडाल तितके चांगले म्हणजे मुलीच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी हे पैसे उपयोगी पडतील.
 • एका मुलीच्या सुकन्या समृद्धी खात्यामध्ये एका वर्षात कमीत कमी रु. २५० जमा करावे लागतात. (वर्षभरात किमान २५० रु न भरल्यास ५० रु दंड भरून खाते पुन्हा सक्रीय करता येते.)
 • एका मुलीच्या सुकन्या समृद्धी खात्यामध्ये एका वर्षात जास्तीत जास्त रु.१.५ लाख जमा करता येतात.
 • एका मुलीसाठी फक्त एकच सुकन्या समृद्धी खाते (SSY) काढता येते.
 • सुकन्या समृद्धी खाते हे कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँक किंवा काही खाजगी बँकांमध्ये आणि पोस्ट ऑफिस मध्ये देखील काढता येते.
 • सुकन्या समृद्धी खाते हे केंव्हाही एका बँकेतून दुसऱ्या बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये ट्रान्सफर करता येते.
 • सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवलेली रक्कम ही करपात्र असते. Income Tax कायद्याच्या कलम 80 C अंतर्गत रु. १.५ लाखांपर्यंत सवलत मिळते. (मिळालेले व्याज + मॅच्युरिटी वरील रक्कम देखील करमुक्त असते.)
 • मुलीचे वय १८ वर्ष झाल्यानंतर SSY खात्यावर मुलीचा पूर्णपणे अधिकार येतो.
 • मुलीचे वय १८ वर्ष झाल्यानंतर मुलीच्या उच्च शिक्षणासाठी SSY खात्यातून ५०% रक्कम काढता येते. ( बाकी उरलेली रक्कम तिच्या लग्नाच्या वेळीस अथवा २१ वर्षे मुदत पूर्ण होतांना जी घटना आधी होईल त्या वेळेस मिळते )
 • सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत SSY खात्यावरील मिळणारे व्याज हे भारतीय अर्थव्यवस्थेच्या चढ-उतारावर अवलंबून असतो. भारत सरकार वेळोवेळी व्याजदर जाहीर करते. तर तिमाहीत व्याजदर बदलू शकतात
 • सुकन्या समृद्धी योजना सुरु झाल्याच्या वर्षी व्याजदर हा ९.१% होता. चालू वर्षातील व्याजदर हा ७.६% आहे.
 • सुकन्या समृद्धी खात्यामध्ये ठेवीचा कालावधी हा २१ वर्षाचा असतो .
 • SSY Maturity Period हा मुलीचे SSY खाते उघडल्याच्या तारखेपासून २१ वर्षे पूर्ण होईपर्यंत असतो.
 • या योजनेत पहिले १५ वर्षेच तुम्हाला पैसे भरायचे असतात. नंतर ६ वर्ष तुम्हाला त्यावर व्याज मिळते .
 • सुकन्या समृद्धी खाते मॅच्युरिटीनंतर बंद न केल्यास, शिल्लक रकमेवर व्याज मिळत राहते. मात्र २१ वर्ष पूर्ण होण्यापूर्वी मुलीचे लग्न झाल्यास खाते आपोआप बंद होते.
 • SSY या योजनेत शासनाकडून जाहीर केल्या प्रमाणे व्याजदर मिळत राहतो. ही योजना शासनाची असल्याने सुरक्षित व्याजदर मिळेल याचा विश्वास मिळतो.
 • या योजनेमध्ये सरकारकडून पैशाची हमी दिली जाते. म्हणजेच आपण केलेली गुंतवणूक ही सरकारकडून सुरक्षित झालेली आहे.
 • SSY सुकन्या समृद्धी खात्यातील एकुण जमा रकमेवर चक्रवाढ पद्धतीने व्याज दर मिळतो.
 • SSY योजनेत शासनाकडून मिळणारे व्याज व योग्य वेळी मिळणारा मोबदला अर्थात पैशाची हमी मिळते.
 • मुलीच्या कल्याणासाठी कमीत कमी रक्कम आपण भरून मुलीच्या भविष्यासाठी बचत करू शकतो. कुटुंबातील किमान दोन मुलीना (जुळ्या असल्यास ३) सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेता येतो.

अभिप्राय द्या!