मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने 31,000 अंशांची ऐतिहासिक पातळी पार केली तर निफ्टीनेदेखील पहिल्यांदाच 9600 अंशांची विक्रमी पातळी ओलांडली. केरळमध्ये मॉन्सूनचे आगमन झाल्यामुळे बाजारात तेजीचे वारे वाहू लागले आहेत. याशिवाय, आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि ब्लूचिप कंपन्यांच्या शेअरमधील तेजीचा यास हातभार लागला.
दिवसभरात सेन्सेक्सने तब्बल 324 अंशांच्या वाढीसह 31,074 अंशांवर विक्रमी पातळी गाठली.
बाजारात मेटल क्षेत्रात चांगला खरेदीचा जोर दिसून आला. याशिवाय, ऑटो, कॅपिटल गूड्स, वीज, आयटी आणि बँकिंग क्षेत्रातदेखील तेजीचे वातावरम कायम राहीले. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येदेखील जोरदार खरेदी आढळून आली. बीएसईचा मिडकॅप निर्देशांक 2.1 टक्क्यांनी वधारुन तर निफ्टीचा मिडकॅप निर्देशांक 1.4 टक्क्याने वधारुन बंद झाला.
निफ्टीवर टाटा स्टील, वेदांता, हिंडाल्को, बीपीसीएल आणि आयटीसीचे शेअर्स सर्वाधिक तेजीत होते तर सन फार्मा, सिप्ला, लुपिन, टीसीएस आणि बँक ऑफ बडोदाचे शेअर्स सर्वाधिकखाली आले

This Post Has 2 Comments

  1. फार्मा मध्ये काही सुधारणा होइल असे वाटत नाही…

    1. हो

अभिप्राय द्या!

Close Menu