भांडवल बाजार नियंत्रक सेबीने देशातील म्युच्युअल फंडांना विदेशी कंपन्यांचे समभाग खरेदी करण्याची परवानगी दिली आहे. जानेवारी महिन्यात सेबीने विदेशी समभाग खरेदी करण्यास फंडांना मनाई केली होती. परंतु आता ही मनाई उठवली गेली आहे. त्यामुळे साहजिकच गुंतवणूकदारांना विदेशी समभागांमध्ये म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याची संधी चालून आली आहे.
सध्या भूराजकीय अशांततेमुळे जागतिक शेअर बाजारांत मोठी पडझड झाली आहे. अनेक विदेशी कंपन्यांचे समभाग कोसळले आहेत. अनेक विदेशी कंपन्यांचे बाजार भांडवलही घसरले आहे. या पार्श्वभूमीवर सेबीने म्युच्युअल फंडांना दिलेली ही अनुमती फंडांच्या आणि पर्यायाने गुंतवणूकदारांच्या पथ्यावर पडणार आहे.