शेअर बाजारात तेजी चालू राहण्याची कारणे काय आहेत?
व्याजदर सातत्याने खाली येत आहेत, त्यामुळे पारंपरिक गुंतवणुकीचे मार्ग अतिशय कमी परतावा देत आहेत. वाढती जागरूकता व पारदर्शकता यामुळे शेअर बाजार व म्युच्युअल फंड याकडे गुंतवणुकीचा चांगला पर्याय म्हणून बघितले जात आहे. तसेच, शेअर व म्युच्युअल फंडामधील एक वर्षापेक्षा अधिक काळासाठी केलेली गुंतवणूक ही करमुक्त आहे. भारत हा जगातील एकमेव देश आहे, की जो ६.५ टक्के दराने प्रगती करीत आहे. लोकसंख्येच्या बाबतीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे, त्यामुळे देशांतर्गत मागणी मोठी आहे. त्यातच लवकरच “जीएसटी’ लागू होणार आहे, जेणेकरून “लॉजिस्टिक्‍स’ एकाच कराच्या अंतर्गत येऊन ही यंत्रणा व्यवस्थितपणे कार्यरत होईल. वरील सर्व बाबींचा विचार करता, देशांतर्गत; तसेच परदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारात पैसे गुंतवतील, त्यामुळे भविष्यात तेजीला बळ मिळण्याची शक्‍यता वाटते.

गुंतवणूक करण्यापूर्वी सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे?
जर आपली गुंतवणुकीची रक्कम ही दोन लाखांपेक्षा कमी असेल, तर म्युच्युअल फंड किंवा “एसआयपी’च्या माध्यमातून करावी. 2) जर गुंतवणूक दोन लाखांपेक्षा अधिक असेल तर त्यातील अर्धा भाग हा शेअरमध्ये व राहिलेला भाग क्रमाने म्युच्युअल फंड आणि “एसआयपी’मध्ये करावा. यामुळे बचत, पैशांची वाढ होईल आणि जोखीम कमी होण्यास मदत होईल .

अभिप्राय द्या!