बजाज ऑटोने सोमवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत २,५०० कोटी रुपयांपर्यंत मूल्याच्या ५४.३५ लाख समभागांच्या पुनर्खरेदीचा (बायबॅक) निर्णय घेतल्याचे घोषित केले आहे. प्रत्येकी ४,६०० रुपये किमतीला प्रस्तावित ही समभाग खरेदी म्हणजे बजाज ऑटोच्या ३८१२.८० रुपये या शुक्रवारच्या बंद भावाच्या तुलनेत २०.६४ टक्क्यमंचे अधिमूल्य मिळवून देणारी आहे. कंपनीच्या या निर्णयाने शुक्रवारी समभागाने जवळपास एक टक्क्याने उसळी घेत ३,९५३ रुपये असे दिवसभरातील उच्चांकी मूल्य गाठले. चालू वर्षांत बजाज ऑटोचा समभाग १९ टक्क्यांनी वधारला आहे.

Leave a Reply