१२ लाख कोटी रुपये बाजार मूल्य असलेली टीसीएस २००४ मध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध झाली. आता जवळपास दोन दशकानंतर टाटा समूहातील अन्य कंपनी भांडवली बाजारात उतरत आहे.टाटा मोटर्सचे भागीदारी पाठबळ लाभलेली टाटा टेक्नाॅलाॅजिज आयपीओ आणण्याची तयारी करत आहे. अभियांत्रिकी व तंत्रज्ञान सेवा क्षेत्रातील या कंपनीत टाटा मोटर्सचा ७४ टक्के हिस्सा आहे.

टाटा समुहाचे अध्यक्षपद भूषविणारे एन. चंद्रेशखरन हे टीसीएसचे सीईओ होते. समुहाचे २०१७ मध्ये सर्वेसर्वा बनल्यानंतर टाटा टेक्नॅलॅजिजच्या रूपात पहिलीच कंपनी आयपीओ आणत आहे.

अभिप्राय द्या!