केंद्र सरकारकडून “सर्वांसाठी घर’ योजना राबवली जात आहे. या योजनेची माहिती देण्यासाठी एचडीएफसी लिमिटेडची उपकंपनी ‘एचडीएफसी रेड’ या कंपनीने सीएलएसएस कॅलक्‍युलेटरची निर्मिती केली आहे. यातून ग्राहकांना गृहकर्जाची पात्रता पडताळता येणार आहे.

अल्प उत्पन्न गट आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचा या योजनेत समावेश आहे. मध्यम उत्पन्न गटालाही प्रधानमंत्री योजनेत घेण्यात आले आहे. ग्राहकांना गृहकर्जासंबंधीची आपली पात्रता www.hdfcred.com/clss या लिंकवर जाऊन एका क्‍लिकवर पडताळता येईल. या लिंकवर जाऊन स्वतःचे व कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न नोंदविले की पात्र असलेल्या सवलती आणि त्यातून अनुदान याची माहिती मिळेल. या साधनामुळे पहिल्यांदा घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना गृहकर्जावर ६.५ टक्‍क्‍यांपर्यंत व्याजात सूट मिळणार आहे. या योजनेतील नियम आणि गुंतागुंत सामान्य माणसाला समजून घेण्यास अवघड आहेत. त्यामुळे कंपनीने कॅलक्‍युलेटरच्या माध्यमातून ही योजना सोपी बनवून तिचे फायदे सामान्यांपर्यंत पोहोचाविण्याचे ठरविले आहे !! याचा वापर धनलाभच्या वाचकांनी घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे .

अभिप्राय द्या!