बिगर ब्रँडेड पण लेबल लावून विक्री होणाऱ्या खाद्यपदार्थांवर बहुचर्चित पाच टक्के वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) आज, सोमवारपासून लागू होणार असल्यामुळे देशात महागाईमध्ये भर पडणे अपरिहार्य आहे. कणिक, पनीर, दही यांसारख्या सुट्या व बिगर ब्रँडेड वस्तू विकताना त्यावर पाच टक्के जीएसटी वसूल करण्यात येणार आहे. त्याच वेळी ५,००० रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या रुग्णालय खोल्यांसाठी जीएसटी आकारण्यात येणार असल्याने वैद्यकीय सेवाही महागणार आहेत.

अभिप्राय द्या!