तुम्ही अजून तुमचा इन्कम टॅक्स रिटर्न भरला नसेल, तर तो लगेच भरा. इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै, २०२२ आहे. दरम्यान सरकारने शेवटची तारीख वाढवण्यास स्पष्ट नकार दिला आहे, म्हणजेच आता तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत ३१ जुलैपूर्वी आयकर भरणे बंधनकारक आहे.

महसूल सचिवांनी म्हटले आहे की सरकार सध्या ३१ जुलैच्या पुढे आयकर फाईल करण्यासाठी मुदतवाढ करण्याचा कोणताही विचार करत नाही. आर्थिक वर्ष २०२१-२२ आणि मूल्यांकन वर्ष २०२२-२३ साठी प्राप्तिकर रिटर्न भरण्याची प्रक्रिया १५ जून २०२२ पासून सुरू झाली आहे.

Leave a Reply