ऐन महागाईच्या काळात रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ करून कर्जदारांना पुन्हा एकदा मोठा झटका दिला आहे. यावेळी मध्यवर्ती बँकेकडून रेपो दरात अर्ध्या टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे, ज्यामुळे तुमचे गृह कर्ज, वाहन कर्ज किंवा इतर कोणत्याही प्रकारचे कर्ज देखील लवकरच महाग होणार आहे. बँकांच्या बाह्य बेंचमार्कशी जोडलेली कर्जे थेट ०.५० टक्क्यांनी महाग होतील आणि तुमच्यावर ईएमआयचा बोजा वाढेल. रेपो दरातील या वाढीमुळे जुने कर्जदार आणि नवीन कर्जदार या दोघांवरही परिणाम होणार आहे.

Leave a Reply