केंद्र सरकारकडून अटल पेन्शन योजनेच्या पात्रतेबाबत नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. या बदलानंतर जे लोक आयकर भरतात त्यांना अटल पेन्शन योजनेचा लाभ घेता येणार नाही. वित्त मंत्रालयाने या संदर्भात एक आदेश जारी केला असून तो १ ऑक्टोबर २०२२ पासून लागू होणार आहे. प्राप्तिकर भरणाऱ्या करदात्यांना यापुढे अटल पेन्शन योजनेमध्ये पैसे गुंतवता येणार नाहीत. सध्या ज्या करदात्यांनी ‘अटल पेन्शन योजने’अंतर्गत गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे, ती गुंतवणूक पुढे सुरू ठेवता येणार आहे, मात्र नव्याने गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या करदात्यांना येत्या १ ऑक्टोबरपासून अटल पेन्शन योजना गुंतवणुकीसाठी उपलब्ध असणार नाही, अशी माहिती केंद्रीय अर्थ मंत्रालयाने एका अधिसूचनेद्वारे दिली आहे.

अभिप्राय द्या!